जास्त व्याजदरात नेहमीच जोखीम : आयुष्याची पुंजी सांभाळामोरेश्वर मानापुरे - नागपूरजास्त परतावा आणि जोखीम या दोन्ही बाबी एकत्र असतात. जास्त जोखिमेच्या योजना फसव्या असतात. उद्या रडत बसण्याऐवजी आजच आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुष्याची पुंजी सांभाळा, असा मोलाचा सल्ला विविध क्षेत्रातील नामवंत अर्थतज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला.शेअर बाजार आणि राष्ट्रीयकृत बँका जास्त परतावा देत नाहीत, मग फसव्या कंपन्या वार्षिक ६० टक्क्यांपर्यंत व्याज कसे देतात, त्या कुठे गुंतवणूक करतात, कंपनीची माहिती याचा इत्थंभूत विचार लोकांनी करावा. गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे व्याजदर, ‘माऊथ पब्लिसिटी’चा आधार आणि त्याला मिळणारी कमिशन एजंटांची साथ, त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होते. श्रीसूर्यानंतर आता प्रशांत वासनकरचा आर्थिक घोटाळा सध्या चर्चेचा विषय आहे. सुरक्षित रकमेतून जास्त व्याजाची अपेक्षा आणि झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता, याचा फायदा फसव्या कंपन्या घेतात. काही सहकारी बँका, संस्था, पतसंस्था, गैरबँकिंग कंपन्या नियमाची पायमल्ली करून जास्त व्याज देतात. तिथेच गुंतवणूकदार फसतात. अखेर पोलीस तक्रार आणि न्यायालयीन लढाईशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. आयुष्याची कमाई कुठे गुंतवावी, यावर तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला.गुंतवणूकदारांनी धडा घ्यावानागपुरात गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँका दामदुप्पट ८ ते ९ वर्षात देतात, मग या फसव्या कंपन्या दोन वर्षात दुप्पट आणि तीन वर्षात तिप्पट रक्कम कशी देतात, हे एक कोडे आहे. कंपनीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार करीत नाहीत. लोक भूलथापांना बळी पडतात. आर्थिक अज्ञानाचा फायदा कंपन्या घेतात. सर्वप्रथम लोकांनी आर्थिक व्यवहाराची माहिती घ्यावी. फसव्या कंपन्यांचे जाळे वाढण्यास कायद्यातील त्रुटी कारणीभूत आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्त) हितसंबंध अधिनियम-१९९९ या कायद्यात केवळ सहा वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा झाल्याचे उदाहारण नाही. युरोपियन देशांत अशा गुन्ह्यांमध्ये ५० वर्षांपर्यंतची शिक्षा होते. गुन्हेगाराला जन्मठेप झाल्यास अशा फसव्या कंपन्या बंद होतील. अशा गुन्ह्याच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि सरकारी वकील असावा. अशा कोट्यवधींच्या घोटाळ्यातून गुंतवणूकदारांनी धडा घ्यावा.विजय कोल्हे, मुख्य सरकारी वकील, जिल्हा सत्र न्यायालय.गुंतवणूकदारांनी काय करावेआयुष्यांची पुंजी गुंतविताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.कंपन्यांची माहिती व पत पाहून गुंतवणूक करा.कंपन्यांचा मागील इतिहास व प्रमोटरची माहिती घ्या.रिझर्व्ह बँक व सहकार खात्याची परवानगी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.कंपनीचा वार्षिक प्रगतीचा लेखाजोखा पाहा. गुंतवणूकदारांनी काय करू नयेमहिनेवारी जास्त व्याज देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक टाळा.कमिशन एजंटच्या माहितीनुसार गुंतवणूक करू नका.दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.कंपनीच्या आदरातिथ्यावर भाळून गुंतवणूक टाळा.एकत्रित रक्कम कंपनी वा बँकांमध्ये ठेवू नका
डबलचा मोह कशासाठी ?
By admin | Updated: July 31, 2014 01:11 IST