शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडबाबत काय म्हणताय युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

By admin | Updated: February 1, 2017 00:47 IST

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात स्टायलिश बॅचलर म्हणून ओळख आहे. तरुणींमध्येही आदित्य चांगलेच प्रसिद्ध आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात स्टायलिश बॅचलर म्हणून ओळख आहे. तरुणींमध्येही आदित्य चांगलेच प्रसिद्ध आहेत. आदित्य ठाकरेंची गर्लफ्रेंड आहे की नाही ? आहे तर ती कोण ? ती काय करते ? अशा चर्चा सर्रास रंगलेल्या आपण पाहिल्यात. पण खरंच आदित्यची गर्लफ्रेंड आहे का याबाबत आदित्यनेच प्रतिक्रिया दिली आहे. 
 
मंगळवारी लोकमत समूहाकडून ''लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड''चे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्हीजगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांनी उपस्थित राहून या सोहळ्याला 'चार चांद' लावले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना  मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा अवॉर्ड देण्यात आला. 
 
अवॉर्ड मिळाल्यानंतर लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्यची मुलाखत घेतली, राजकारणाशिवाय अनेक विषयांवर आदित्यसोबत गप्पा रंगल्या. राजकारणाव्यतिरिक्त अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्यवर झाली. पण आदित्यनेही तितक्याच खुबीने प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाऊन्सर पॉलिटिकली डक केले. 
 
गर्लफ्रेंडबाबत कोणाबरोबर मोकळेपणाने बोलशील असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विचार न करता आदित्यने आईसोबत असं उत्तर दिलं. मात्र, गर्लफ्रेंड आहे की नाही याबाबत उत्तर देण्याचं त्याने कटाक्षाने टाळलं. हो नाही, हो नाही करत अखेर तो प्रश्न मागे पडला अन् आदित्य ठाकरेंची गर्लफ्रेंड आहे का ? याच्या उत्तराची प्रतीक्षा आणखी लांबली. 
 
शाळेत असताना आदित्य कसा विद्यार्थी होता? यावर ते म्हणाले, राजकारणात असलो तरी मी वाईट विद्यार्थी नव्हतो.  शाळा कधी बंक केली नाही, कधी आजारी असल्याचं किंवा पोट दुखत असल्याचं सांगून सुट्टी घेतली नाही. हे उत्तर देताना ओघाने आदित्य यांची नजर आईकडे वळली आणि हो ना आई असा इशाराही त्याने केला. 
 
जेवण झाल्यावर कोणाच्या कपडयांना हात पुसलेस का? असं विचारलं तेव्हा...आदित्यमधील खोडकर मित्र सा-यांना कळाला. हो मित्रांच्या शर्टला मी हात पुसलेत. मला मित्रांच्या बुटांवर स्टॅम्प मारायचीही खोड होती अन् यामुळे माझे मित्रही हैराण असायचे.
तुम्हाला खरं वाटणार नाही पण स्टेजवर येऊन शिवसैनिकांमद्ये उत्साह भरणा-या आदित्यला स्टेजची प्रचंड भीती होती अशी कबुलीही त्याने यावेळी दिली.  कधी एकदा स्टेजवरून पळतो असं वाटायचं असं तो एका प्रश्नावर म्हणाला. 
 
याशिवाय अनेक प्रश्न आदित्यला विचारण्यात आले आणि त्यानेही तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली. अखेर येत्या मुंबई महापालिकेत शिवसेनाच बाजी मारेल असा विश्वास आदित्यने व्यक्त केला.       
ही संपूर्ण मुलाखत तुम्ही लोकमतच्या फेसबुक पेजवर पाहू शकता.