शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांची छळवणूक थांबविण्यासाठी काय केले?

By admin | Updated: July 13, 2017 05:33 IST

वाहतूक पोलीस भ्रष्टाचारामुळे सामान्यांचा पोलिसांवरून उडालेला विश्वास पुन्हा बसविण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहतूक पोलीस भ्रष्टाचारामुळे सामान्यांचा पोलिसांवरून उडालेला विश्वास पुन्हा बसविण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना केली. लाच मागण्यासाठी सामान्यांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी व लाच स्वीकारून, ‘नो पार्किंग’ झोनमध्येही वाहनांना पार्क करण्याची परवानगी देऊन पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचलली? असे विचारत न्यायालयाने सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक पोलीस विभाग) यांना तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. चार वर्षांपूर्वी वाहतूक विभागात काम करणारे सुनील टोके यांनी, वाहतूक विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीडीमध्ये लाच स्वीकारताना दिसत असलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी, अशी मागणीही टोके यांनी याचिकेद्वारे केली. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. टोके यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक पोलीस विभागच चौकशी करत असल्याबद्दल, न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. आपल्याच खात्यातील लोकांना वाचविण्यासाठी ते कर्तव्यबद्ध आहेत, असा टोलाही अधिकाऱ्यांना लगावला. ‘पोलिसांनी लाच मागितल्याने सामान्यांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी काय केले ? तसेच पोलिसाने लाच मागितल्याची तक्रार आल्यास काय केले जाते ? याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्या,’ असे निर्देश न्यायालाने वाहतूक विभाग सहायुक्त अमितेश कुमार यांना देत, याचिकेवरील पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.