शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांत आम्हाला सरकारने काय दिले?

By admin | Updated: November 23, 2014 00:41 IST

११४ गोवारींच्या बलिदानाला आज २० वर्षे पूर्ण झाली. या काळात सरकारने आम्हाला काय दिले? आदिवासींच्या सवलती मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे. सर्व शासकीय दस्तावेज असतानाही

संतप्त गोवारी बांधवांचा सवाल : कधी संपणार वनवास?नागपूर : ११४ गोवारींच्या बलिदानाला आज २० वर्षे पूर्ण झाली. या काळात सरकारने आम्हाला काय दिले? आदिवासींच्या सवलती मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे. सर्व शासकीय दस्तावेज असतानाही सरकारकडून मागण्यांना डावलले जात आहे. हा वनवास कधी संपणार, असा सवाल संतप्त गोवारींनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा व आदिवासींच्या सवलती गोवारी समाजाला मिळाव्यात या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ विधिमंडळावर गोवारी समाजाचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. घटनेची दखल घेत एक स्मारक, उड्डाणपुलाला शहिदांचे नाव व २ टक्के विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण दिले. ३९ उच्च जाती समाविष्ट केल्या. दरवर्षी एक नवीन जात त्यात समाविष्ट करीत आहे. सरकारने २०१३ ला परिपत्रक काढून १९९५ नंतर गोंडगोवारी जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीस लागलेल्या गोवारी बांधवांना नोकरीतून काढण्याचा धडाका सुरू केला. स्मारकाची अवस्थाही बिकटशासनाने शहीद गोवारींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नोकऱ्या दिल्या नाहीत. आज स्मारकाची अवस्था अतिशय बिकट आहे. उड्डाणपुलावर लिहिलेले नाव तुटलेले आहे. दिलेले आरक्षणही तुटपुंजे आहे. गोवारींच्या बलिदानानंतरही सरकारने त्यांच्या मूळ मागणीला बगल दिली आहे. गोंडगोवारी ही बोली भाषा आहे. गोंड वेगळी व गोवारी वेगळी जमात आहे. २००२ पर्यंत गोंडराजगोंड अशी अनुसूचीमध्ये नोंद होती. मात्र लोकसभेत दुरुस्ती विधेयक येऊन गोंड राजगोंडमध्ये जसा कॉमा टाकला, तसा गोंडगोवारीमध्ये टाकावा. इंग्रजांच्या काळात या गोवारी समाजाला आदिवासींच्या सवलती मिळत होत्या. माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीतही ‘गोंडगवारी’ ही जमातच अस्तित्वात नसल्याचे दस्तावेज आहेत. असे असतानाही, सरकारकडून वारंवार अन्याय होत आहे. समाजाचे मंत्री, आमदार निवडणुकीपुरती आश्वासन देऊन मोकळे होतात. फडणवीस, गडकरी वाहणार श्रद्धांजलीशहीद गोवारी स्मारक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी रविवारी, सकाळी ११ वाजता श्रद्धांजली वाहतील.