शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिमापक खरेदीस विलंब का?

By admin | Updated: July 5, 2016 01:32 IST

सणांच्या काळात वाढणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये राज्य सरकारला ३० एप्रिलपर्यंत ध्वनिमापक यंत्रे खरेदी करण्याची अंतिम मुदत दिली होती.

मुंबई : सणांच्या काळात वाढणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये राज्य सरकारला ३० एप्रिलपर्यंत ध्वनिमापक यंत्रे खरेदी करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र मुदत पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी राज्य सरकारची यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने ध्वनिमापक यंत्रे खरेदी करण्यास विलंब का झाला? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. यावर राज्य सरकार उच्च न्यायालयाला समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही.ध्वनिप्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत, यासाठी ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ता महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी एकूण १,८४३ ध्वनिमापक यंत्रे खरेदीसाठी निविदा काढल्या असून, त्यातील निम्मी यंत्रे जुलै अखेरीस खरेदी करण्यात येतील, तर उर्वरित आॅगस्ट अखेरीस खरेदी करण्यात येतील, असे आश्वासन खंडपीठाला दिले. ध्वनिमापक यंत्रे ३० एप्रिलपर्यंत उपलब्ध करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. तरीही अद्याप ही यंत्रे उपलब्ध करण्यात आली नाहीत. यंत्रे खरेदी करण्यास विलंब का करण्यात आला? अशी विचारणा खंडपीठाने सरकारकडे केली. त्यावर अ‍ॅड. वग्यानी यांनी ध्वनिमापके यंत्रे खरेदी करण्याची जबाबदारी महसूल, पर्यावरण की गृह विभाग यापैकी कोणत्या विभागाकडे सोपवावी, याबद्दल गोंधळ निर्माण झाल्याने निर्णय घेईपर्यंत विलंब झाला, असे स्पष्टीकरण दिले. मात्र सरकारचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी) सणांच्या काळात यंत्रे असावीतही यंत्रे जुलै व आॅगस्ट अखेरीस ताब्यात येणार असल्यासंदर्भात कागदपत्र तसेच खरेदी संदर्भातील कागदपत्रेही सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ‘आता सण सुरू होतील. या वेळी ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी ही यंत्रे असलीच पाहिजेत,’ असे खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ जुलै रोजी ठेवली आहे.