शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

...यामध्ये अपराधीपणा कसला?

By admin | Updated: June 19, 2016 02:15 IST

समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या

पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या महात्म्यांच्या जीवनचरित्रांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. गिरीश दाबके संपादित ‘लोकमान्यांची सिंहगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉ. दीपक टिळक, मुक्ता टिळक आदि उपस्थित होते.नायडू म्हणाले, ‘सध्याच्या पिढीला महात्म्यांच्या हौतात्म्याची फारशी माहिती नाही. तरुणाईची वाचनाची आवडही पूर्वीसारखी राहिलेली नाही. या पिढीला स्वातंत्र्यसमराचे आणि इतिहासाचे स्मरण करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.टिळकांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (प्रतिनिधी)