शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 10:30 IST

पाली भाषेचा राज्यघटनेतील आठव्या शेड्युलमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी डॉ. खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाली प्राकृत ही देशातील प्राचीन भाषा. तथागत गौतम बुद्धाने आपले विचार पाली भाषेतच सांगितले. या भाषेतच ते जगभर पोहोचले. असे असतानाही या भाषेला अभिजात भाषेचा मात्र दर्जा नव्हता. तो अखेर मिळाला. परंतु हे काही सहजासहजी झालेले नाही. यासाठी नागपूरकरांनी दीर्घ लढा दिला आहे. आज या लढ्याला अखेर यश आले. 

पाली भाषेचे संवर्धन व्हावे, पाली विद्यापीठाची स्थापना व्हावी, संविधानाच्या शेड्युल ८ मध्ये पाली भाषेचा समावेश करण्यात यावा आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिवंगत डॉ. भाऊ लोखंडे, दिवंगत डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी मोठा लढा दिला. डॉ. विमलकिर्ती, डॉ. मालती साखरे, डॉ. नीरज बोधी, सुधीर भगत  यांच्यासारख्या अनेक जणांनी हा विषय लावून धरला. डॉ. खांडेकर यांनी याला लोकचळवळ बनवले. पाली प्राध्यापक परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन केले. 

हायकोर्टातही दिला होता लढापाली भाषेचा राज्यघटनेतील आठव्या शेड्युलमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी डॉ. खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यांच्यावतीने ॲड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली. आता पाली भाषेचा आठव्या शेड्युलमध्ये समावेश होणार आहे. ॲड. नारनवरे यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. 

आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा मिळाला, त्यांना कोणते लाभ दिले गेले याबद्दल २०१६ साली सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती दिली होती. - संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते. - भाषा संवर्धनासाठी या दर्जाचा फायदा होतो. - मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे शक्य होते. - भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय केली जाते. - प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतात. - महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी मदत होईल. - मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी आदींना भरीव मदत मिळेल. 

टॅग्स :marathiमराठी