शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समित्यांचं काय?

By admin | Updated: July 23, 2016 04:28 IST

जात पडताळणी समित्यांच्या मनमानीचा मुद्दा अनेकदा सभागृहात चर्चेला आला.

मुंबई : जात पडताळणी समित्यांच्या मनमानीचा मुद्दा अनेकदा सभागृहात चर्चेला आला. वारंवार सूचना देवूनही या समित्यांचा कारभार सुधारत नाही. आता तर थेट न्यायालयानेच या समित्यांना फटकारले आहे. कायद्याचे भान ठेवत काम करा, अन्यथा थेट तुरुंगात रवानगी करण्याची तंबीच न्यायालयाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समित्यांचा कारभारात बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे सदस्य हेमंत टकले यांनी शुक्रवारी केली. विधान परिषदेत टकले यांनी जात पडताळणी समित्यांबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. जुलै, आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर समित्यांची घोषणा केली आहे. मात्र, पडताळणी समिती आणि आयुक्तांची पदे अर्धन्यायिक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार हतबल ठरते. आता न्यायालयानेच या समित्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे पडताळणी समित्यांकडून होणारी अडवणूक संपविण्याची मागणी टकले यांनी केली. राणे, शंका घेऊ नका -सभापती राणे यांनी सरकारचे लक्ष नसल्याचे सांगत औचित्याच्या मुद्यांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, औचित्याचे मुद्दे सदस्यांच्या हातातील प्रभावी आयुध असल्याचे सभापती रामराजेनाईक-निंबाळकर यांनी राणे यांना सुनावले. प्रत्येक औचित्याच्या मुद्याची सरकारकडून दखल घेतली जाते. औचित्याच्या मुद्यांसंबंधीचे असे अनेक अहवाल मी स्वत: वाचले आहेत. त्यामुळे या आयुधाबाबत आश्वस्तरहा. शंका घेवू नका, असे सभापतींनी राणे यांना सांगितले. (प्रतिनिधी)विधान परिषदेतही पोकेमॉन गोपाश्चिमात्य देशातील आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमची दखल विधान परिषदेलाही घ्यावी लागली. व्हर्च्युअल आणि रिअल लाईफचा मिलाफ असणा-या गेमने अनेकांना वेड लावले असले तरी त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या खेळाच्या नादात अनेकांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी, तरुणांसह या गेमची आवड असणा-यांना गेमबाबत दक्षतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेना सदस्या नीलम गो-हे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधान परिषदेत केली.