शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंवर काय कारवाई केली?

By admin | Updated: July 15, 2017 05:24 IST

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत काय कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत काय कारवाई केली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली असून, मंत्रिमंडळात पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री खडसे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात खडसेंविरुद्ध ११०० पानांची जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. ए.ए. सय्यद व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारने खडसेंवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा करत न्यायालयाने राज्य सरकारला आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.दमानिया यांच्या याचिकेनुसार खडसे यांची मालमत्ता राज्यभर पसरली आहे. तर दमानिया यांनी राजकीय हेतूने याचिका करून प्रसारमाध्यमांना जाणूनबुजून माहिती दिली आहे. जेणेकरून ‘मीडिया ट्रायल’ व्हावी. त्यामुळे ही याचिका फेटाळावी, अशी विनंती खडसेंच्या वकिलांनी न्यायालयाला केली.गेल्या वर्षी खडसे यांना पुण्यातील भोसरी जमीन खरेदीप्रकरणी महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला अहवाल दिला. यात खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत शिफारस केली नसल्याचे समजते. त्यामुळे खडसे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची आशा होती. मात्र आता या केसमुळे खडसेंच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.