शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाडा, खान्देशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:38 IST

पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास

- लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत त्याबाबत चांगला निर्णय घेणार असल्याची माहिती जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेणार असून, वेळ पडल्यास पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाजन म्हणाले, आठवड्यापासून जलसंपदा खात्याची यंत्रणा त्याचा अभ्यास करीत असून, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. ते विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. पाणी वळविणार मालेगाव, नाशिक, मराठवाडा, जळगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल, ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. त्याबाबत मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री