शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक-व्यावसायिकांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

By admin | Updated: July 10, 2014 23:22 IST

8क् सी खाली होणारी गुंतवणूक मर्यादा व गृहकर्जावरील व्याजावरील सवलत वाढीमुळे मध्यमवर्गीय विशेषत: पगारदारांना दिलासा देणारे बजेट आहे.

आयकर, 8क् सी खाली होणारी गुंतवणूक मर्यादा व गृहकर्जावरील व्याजावरील सवलत वाढीमुळे मध्यमवर्गीय विशेषत: पगारदारांना दिलासा देणारे बजेट आहे. त्याचप्रमाणो उत्पादन शुल्कातून दिलेल्या सवलती कारखानदारांना दिलासा देणा:या आहेत. उत्तरपूर्व राज्यांना आवश्यक असणारी, सरकारने घेतलेली दखल हे या बजेटमधील महत्त्वाचे पाऊल वाटते. 
- सूर्यकांत पाठक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
 
अंदाजपत्रकात दरवर्षीच तंबाखू, सिगारेट, गुटख्याच्या किमंती वाढविल्या जातात. मात्र, या अंदाजपत्रकात एवढया मोठया प्रमाणात वाढतील असे वाटत नव्हते. या वस्तूंच्या किमंती वाढत असल्याने त्याला पर्याय म्हणून उलब्ध होत असलेल्या अनेक वस्तूंकडे ग्राहक ओढले जात आहेत. परिणामी आधीच व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून किमती वाढल्याने आमच्या व्यवसायावरही मोठा परिणाम होणार आहे. - रामचंद्र लोंढे  
 
या अंदाजपत्रकात तंबाखूजन्य पदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने अनेक होलसेल विक्रेत्यांनी सिगारेट, तंबाखू, विडी, तसेच पानमसला याचा कुत्रीम तुडवडा निर्माण केला आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आमच्यासरख्या टपरीधारकांना तो अवाजवी दराने विकला जाईल.  आमच्यासाठी हे अंदाजपत्रक बुरे दिन आल्या सारखेच आहे. - विक्रम गायकवाड
 
स्मार्ट सिटीच्या रुपाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतुद व गृह कर्जावरील व्याज कपातीची मर्यादा दीड लाखावरुन दोनलाख रुपये करण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला फायदा मिळणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीमुळे बांधकाम क्षेत्रसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकेल.
- रोहित गेरा (उपाध्यक्ष, केड्राई पुणो मेट्रो)
 
संरक्षण क्षेत्रसाठी करण्यात आलेली भरीव तरतुद व पायाभूत सुविधा वाढीसाठी उचलण्यात आलेली पावले उद्योग जगतासाठी आश्वासक आहेत. थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) दिलेल्या मान्यतेमुळे गुंतवणुकीत वाढ होईल. उद्योगवाढीला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. 
- सुधीर भिसे, उद्योजक 
 
रियल इस्टेट  इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. परवडणा:या घरांसाठी करातून सवलत व बांधकाम व्यवसायाला ‘इन्फ्रा’ दर्जा देण्याची मागणी होती. ही मागणी मान्य झाली नसली तरी त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 
- ललितकुमार जैन, 
माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केड्राई
 
माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक उद्योगाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. आयत विभागात कागपत्रंची पूर्तता करण्यासाठी पाच दिवस लागत होते. त्यामुळे व्यापा:यांचे नुकसान होत होते. एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार असल्याने वेळेची बचत होईल. एकूणच व्यवसायवाढीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 
- विनायक पंडित, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र
 
संतुलित अर्थसंकल्प असे यंदाच्या अंदाजपत्रकाचे वर्णन करावे लागेल. तेलाच्या आयातशुल्कात कपात करण्याचे जाहीर केल्याने भाववाढीला आळा बसेल. उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. प्राप्तीकराच्या मर्यादेत वाढ केल्याने  त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल.  
- वालचंद संचेती, 
अध्यक्ष, पुना र्मचट चेंबर
 
 उद्योग जगतासाठी अत्यंत कल्पकतेने केलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे उद्योगवाढीला वाव मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उद्योसाठी आशादायक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. भविष्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प स्वागताह्र्य असून भविष्यात त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील.  
- कुमार ताम्हाणो 
(उद्योजक)