शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींसाठी स्वागताचे गालिचे

By admin | Updated: May 18, 2014 00:27 IST

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना स्वत:हून अभिनंदनाचा फोन केला आणि अमेरिका भेटीचे रीतसर निमंत्रणही दिले.

ओबामांचा फोन : अमेरिका भेटीचे निमंत्रण; चीनचाही स्वागताचा खलिता
 
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचा (नाकारलेला) व्हिसा या बहुसंख्यांच्या मनात रुतलेल्या घावाबद्दल अनेकानेक टिप्पण्ण्या व्हॉट्सअॅपवरून फिरत असतानाच्या विजय-रात्रीच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना स्वत:हून अभिनंदनाचा फोन केला आणि अमेरिका भेटीचे रीतसर निमंत्रणही दिले. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात विशाल लोकशाही असलेले दोन्ही देश यापुढच्या काळात परस्पर सहकार्याचे नवे मानदंड निर्माण करतील 
असा विश्वासही ओबामांनी व्यक्त केल्याचे कळते.
स्वजनांच्या संहाराचा, अतिरेकी धार्मिक दुजाभावाचा आरोप ठेऊन ज्यांना अमेरिकेने आपली दारे बंद केली आणि अति-उजव्या विचारसरणीचा, एककल्ली नेतृत्वाचा दोषारोप ठेऊन स्वदेशातल्या बुद्धिवाद्यांसह परदेशातल्या विचारवंतांनी, नेते आणि मुत्सद्यांनी आजवर ज्यांच्याकडे संशयाने पाहिले असे मोदी भारतातल्या सत्तासोपानाची पायरी चढण्यास सज्ज झाल्यावर जागतिक नेत्यांनी त्यांच्यासाठी स्वागताचे गालिचे अंथरले आहेत.  जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या भरभक्कम जनादेशाचे अत्यंत उत्साहात स्वागत अनेक बडय़ा राष्ट्रांच्या प्रमुखांनी नव्या सरकारला मैत्रीचा हात देत 
नव्या स्नेहपूर्ण सहकाराची आशा व्यक्त केली आहे.  इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी मोदींना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले आणि ‘लूकिंग फॉरवर्ड टू मीट यू’ म्हणत लंडन भेटीचे निमंत्रणही दिले.
 
भारत आणि अमेरिका या दोघांमधील परस्पर भागीदारीचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भविष्यात एकत्रितपणो काम करण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली आहे. दोन्ही देश परस्पर सहकार्याची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहातील.
- प्रवक्ता, व्हाइट हाऊस,  वॉशिंग्टन डीसी
 
भारतीय निवडणुकीवर मी स्वत: बारकाईने लक्ष ठेवून होतो, तुमचा सगळा प्रवास मी अत्यंत उत्सुकतेनं पाहिला आहे. 
- नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान
 
भारत-इस्त्रयल संबध अधिक दृढ होण्यासाठी आपण परस्पर सहकार्य 
करू, आपले नाते अधिक सक्षम होईल अशी आशा आहे. 
- बेंजामिन नेत्यानहू, पंतप्रधान, इस्रायल