शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंंगराव पवार यांच्या शाहू ग्रंथाचे जर्मनीत स्वागत

By admin | Updated: August 19, 2015 01:04 IST

सुधीर पेडणेकरांचा अनुवाद : वाचकांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा जर्मन विद्यापीठाचा मानस

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू ग्रंथाचे जर्मनीत उत्साही स्वागत करण्यात आले आहे. गतवर्षी १२ नोव्हेंबरला शाहू गं्रथाच्या जर्मन आवृत्तीचे प्रकाशन जर्मन कौन्सुल जनरल मायकेल सिबर्ट यांच्या हस्ते विद्यापीठात झाले होते. या ग्रंथाचा जर्मन भाषेतील अनुवाद स्वित्सर्लंड येथे वास्तव्यास असलेले कोल्हापूरचे सुपुत्र सुधीर पेडणेकर यांनी केला होता. पेडणेकर यांनी हा अनुवादित जर्मन शाहू ग्रंथ भारतविद्या विषयावर संशोधन सुरू असलेल्या सर्व विद्यापीठांना सप्रेम भेट म्हणून पाठवलेला होता. यामध्ये बर्लिन, बॉन, फ्रीबर्ग, गॉटिगजेन, विटेनबर्ग, हम्बर्ग, हायडलबर्ग, लिपझिक, आदी ठिकाणच्या विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्वच विद्यापीठांतून या ग्रंथाचे स्वागत करण्यात आले आहे. गं्रथाच्या जर्मनीतील स्वागताबाबतची पत्रे पेडणेकर यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीला पाठवली आहेत. हा ग्रंथ अभ्यासकांना व सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जर्मन विद्यापीठांनी म्हटले आहे. हायडलबर्ग विद्यापीठाच्या इंडॉलॉजी (भारतविद्या) विभागाचे प्रमुख डॉ. एलनोर स्मिट यांनी या ग्रंथामुळे आमच्या ग्रंथसंग्रहात मोलाची भर पडली आहे. हा ग्रंथ आम्ही विद्यापीठाचे अभ्यासक आणि जर्मनीमधील सर्व अभ्यासकांसाठी ई - लायब्ररी तसेच इंटर लायब्ररी - लोन सिस्टम या सुविधांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे, असे म्हटले आहे. शाहंूचे चरित्र जगभर पोहचावे असे वाटते, अशा शाहूप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.शाहू ग्रंथाची रशियन,हिंदी आवृत्ती लवकरचशाहू- ग्रंथ अभियानांतर्गत लवकरच शाहू ग्रंथाच्या हिंदी व रशियन आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. हिंदी अनुवाद प्रा. डॉ. पद्मा पाटील व रशियन अनुवाद प्रा. डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बीकवा यांनी केला आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून देशात आणि परदेशात शाहू चरित्राचा प्रसार करण्याचे अभियान डॉ. पवार यांनी सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत कन्नड, कोकणी, इंग्रजी, जर्मन, उर्दू, तेलगू आदी भाषांत शाहू ग्रंथ प्रकाशित झाला आहे. उर्दू व तेलगू भाषेतील ग्रंथाचे ५ जुलैला हैद्राबाद येथे प्रकाशन झाले आहे.