शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-अंधेरी लोकलचे पालघरला स्वागत

By admin | Updated: September 20, 2016 03:32 IST

आज पासून सुरु झालेल्या डहाणू अंधेरी या लोकल ट्रेन चे भाजपाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

पालघर : खासदार चिंतामण वनगा याच्या प्रयत्नाने आज पासून सुरु झालेल्या डहाणू अंधेरी या लोकल ट्रेन चे भाजपाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.पश्चिम रेल्वेचे उपनगरी क्षेत्र डहाणू रोडपर्यंत विस्तारीत झाल्यानंतर सुरु झालेल्या लोकल ची संख्या मर्यादित राहिल्याने त्याचा मोठा त्रास इथल्या प्रवाशांना सोसावा लागत होता.त्यातच डहाणू ते बोरिवली अशा लोकल धावत असल्याने अंधेरी पर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बोरिवली स्टेशन ला उतरून अंधेरी पर्यंत पोहचायला इथल्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असताना डहाणू-अंधेरी दरम्यान लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी प्रवाशांनी खासदार वनगा यांच्या कडे केली होती. त्यांच्या प्रयत्नाने प्रथमच आज डहाणू रोड ते अंधेरी स्थानकादरम्यानच्या पहिल्या लोकलचे आज सकाळी ६.१७ वाजता पालघर रेल्वे स्टेशनवर भाजपा मंडळाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. अध्यक्ष तेजराजसिंह हजारी, पालघर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष जयंत दांडेकर, सरचिटणीस नंदु पावगी व पालघर राजस्थान विकास संघाचे मोहनलाल जैन, नीता चव्हाण इ, च्या पाठपुराव्याला यश येऊन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी अंधेरी लोकल आज सुरू झाली. बोरीवलीकडे जाणारी ईएमयू लोकल क्र . ९३००२ डहाणू रोड वरु न पहाटे ५.५० ऐवजी ५.४० वाजता सोडून तिचा विस्तार अंधेरी पर्यंत करण्यात आला आहे. यावेळी सर्व रेल्वे प्रवाशांनी ही सेवा सुरु करण्याकरता केलेल्या प्रयत्नांबद्दल भा.ज.पा चे आभार मानून आनंद व्यक्त केले. (प्रतिनिधी)