शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भार दप्तराचा

By admin | Updated: July 9, 2017 00:44 IST

राज्य शासनाने २१ जुलै २०१५ रोजी निर्णय घेत दप्तराचे आदर्श वजन ठरवून दिलेले आहे. या निर्णयात शासनाने शाळेसोबतच पालकांनाही काही सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाने २१ जुलै २०१५ रोजी निर्णय घेत दप्तराचे आदर्श वजन ठरवून दिलेले आहे. या निर्णयात शासनाने शाळेसोबतच पालकांनाही काही सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईतील बहुतेक मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शासन निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. अपवादात्मक काही शाळांनी शासन निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दप्तर शाळेतच ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तर काही शाळांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत विद्यार्थ्यांना टॅब आणि ई-क्लासेसच्या मदतीने दप्तराच्या ओझ्यातून मुक्त केले आहे. मुलांचे सरासरी वजन ठरवत त्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन शासनाने ठरवले होते. त्यासाठी दप्तरामधील साहित्य आणि खाऊचा डबा यांचे वजन किती असावे, याचा तक्ताही शासनाने जाहीर केला होता. मात्र, त्याकडे कानाडोळा करत शाळा प्रशासनांकडून पालकांवर साहित्य खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे साहजिकच दप्तराचे ओझे वाढत आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर आली जाग...दप्तराच्या वाढत्या भारामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनातर्फे तत्कालीन प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यावर इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर किती किलो वजनाचे दप्तर असावे, याबाबतचा अहवाल समितीने सादर केला होता. तसेच पालकांनी, शाळेने कोणती काळजी घ्यावी याबाबत उपाययोजनाही सुचवण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागातर्फे २१ जुलै २०१५ रोजी अध्यादेश काढण्यात आला होता. राज्य मंडळाच्या शाळांकडून या नियमावलीच्या पालनाबाबत सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते. मात्र, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या बहुतेक सर्व शाळांकडून या निर्णयाला सध्या केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.