शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

By admin | Updated: June 6, 2017 00:11 IST

परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी चौथ्या दिवशीही जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली. तसेच पिंगळी येथे रास्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नावर जिल्ह्यात १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता गावातच वाटली जात आहेत. रविवारीदेखील हा संप सुरु ठेवण्यात आला. परभणी शहरालगत असलेल्या ब्राह्मणगाव परिसरात किसान क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भाजीपाल्याची वाहने अडवून ती परत पाठविली. पिंगळी येथे सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परभणी- पालम महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. पिंगळी गावात शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध ओतून देऊन निषेध नोंदविला. पिंगळी विकास संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष संघटनांनीही संपात सहभाग घेतला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाऊसाहेब गरुड, उमेश खाकरे, डी. डी. गरुड, ज्ञानराज पाटील, अंगद गरुड, सतीश खाकरे, गजानन गरुड, राज गरुड, अरुण साखरे, श्याम गरुड, सुंदर गरुड, अंकुश गरुड, शिवा दामोधर, शंकर गरुड, रावसाहेब गरुड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील पेडगाव येथील बाजारपेठही रविवारी बंद पाळण्यात आली. पिंपळगाव, एकरुखा, ब्रह्मपुरी, वडगाव, किन्होळा, पान्हेरा, भोगाव, गव्हा, मोहपुरी, हसनापूर, कार्ला, तुळजापूर, गोविंदपूर, सारंगपूर, कुंभारी, आर्वी आदी १८ गावांतील शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. रविवारी सकाळी शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य टी. एम. देशमुख, गोविंद देशमुख, संतोष देशमुख, नारायण देशमुख, पंडित देशमुख, माणिक जेवणार, प्रसाद देशमुख आदींनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे बैलगाडीने आणलेला शेतीमाल काही शेतकऱ्यांनी बाजार परिसरातच फेकून दिला. तर काहींनी गावाकडे परत नेला. दरम्यान, बाजार न भरल्याने सुमारे तीन लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.झरी येथेही रविवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी जलालपूर, नांदापूर, पिंपळा, जवळा, मिर्झापूर, वाडी आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. परंतु, अचानक बाजार बंद राहिल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. सोमवारीदेखील झरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बालाजी देशमुख, ओंकार सावंत, गजानन चव्हाण, अभिजीत परिहार, गजानन हेंडगे, अंकुश जोशी, किरण देशमुख आदींनी केले आहे. ताडकळस येथेही आठवडी बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला. बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर टाकून देत निषेध व्यक्त करण्यात आला.