शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याच्या विक्री एका दिवसातच !

By admin | Updated: August 26, 2014 01:05 IST

जिल्ह्यातील पेट्रोल पंप मंगळवार, २६ आॅगस्टपासून बेमुदत बंद राहण्याच्या वृत्ताने सोमवारी शहरातील सर्वच पंपांवर पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपाच्या भीतीने सर्वच

संपाची भीती : पंपांवर रांगा, ग्राहकांना त्रासनागपूर : जिल्ह्यातील पेट्रोल पंप मंगळवार, २६ आॅगस्टपासून बेमुदत बंद राहण्याच्या वृत्ताने सोमवारी शहरातील सर्वच पंपांवर पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपाच्या भीतीने सर्वच जणांनी एरवीपेक्षा दुप्पट, तिप्पट आणि टाकीभर पेट्रोलची खरेदी केल्याने एका दिवसात आठवडाभराच्या पेट्रोलची विक्री झाली. असोसिएशनने बंद मागे घेतल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सर्वच पंपांवर सकाळी १० वाजेपासून ग्राहकांच्या रांगा होत्या. बहुतांश पंप दुपारीच कोरडे झाले, तर काही पंपांवर ‘पेट्रोल नाही’ अशा पाट्या झळकत होत्या. ग्राहकांना पेट्रोल खरेदीसाठी त्रास सहन करावा लागला. युवक-युवती, महिला, वयस्कांनाही रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. काही पंपावर ग्राहकांना मर्यादित पेट्रोलची विक्री करण्यात आल्याने पंपचालकांशी वाद झाल्याच्या घटना झाल्याची माहिती आहे. बंदचे हत्यार ग्राहकांच्या फायद्यासाठीचफेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे बेमुदत बंदचे हत्यार ग्राहकांच्या फायद्यासाठीच होते. राज्य शासनाने व्हॅट आणि एलबीटी हटविल्यास ग्राहकाला पेट्रोल प्रति लिटर ५ ते ६ रुपयांनी स्वस्त मिळेल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यास सात दिवसातच पेट्रोलवरील एलबीटी आणि व्हॅट दूर करण्याचे आश्वासन दिल्याने असोसिएशनने संप मागे घेतला. बंद पाळण्याची घोषणा केल्यानंतर सामान्य ग्राहकांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली होती. पेट्रोल स्वस्त होण्याआधी पंपावरील अतिरिक्त साठा विकून जास्त नफा कमावण्याचा आमचा उद्देश नव्हता. पेट्रोल स्वस्त वा महाग केव्हा होते, हे आम्हालाही कळत नाही. रात्री मॅसेज येतो किंवा टीव्हीवरील बातम्यांद्वारे आम्हाला माहीत होते. एवढेच नव्हे तर तेल कंपन्यांच्या चेअरमनलाही माहीत नसते. असे असताना ग्राहकांचा उपरोक्त आरोप खोटा आहे. रविवारी डेपो बंद होते. सोमवारी पंपावर टँकर येणे सुरू झाले. सध्या स्थिती आटोक्यात आहे.हरविंदरसिंग भाटिया, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन१२ लाखांपेक्षा जास्त लिटर पेट्रोलची विक्री!संपाच्या भीतीपोटी ग्राहकांनी रांगेत लागून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची खरेदी केली. दरदिवशी शहरात अडीच ते तीन लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. एरवी १०० रुपयाचे पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकाने ३०० ते ५०० रुपयांपर्यंत पेट्रोल खरेदी केल्याने नागपुरात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा जास्त लिटर पेट्रोलची विक्री झाल्याची माहिती आहे. पेट्रोल विक्रीचा विक्रम असावा, असे मत ग्राहकांनी मांडले.पंपचालकांची ‘बल्ले बल्ले’सोमवारी तेल कंपन्यांचे अधिकारी जिल्ह्यातील कोणत्याही पंपाकडे फिरकले नाहीत. त्याचाच फायदा पंपचालकांनी घेतल्याच्या तक्रारी ग्राहकांनी लोकमतकडे केल्या आहेत. खरेदी ३०० रुपयांची, पण पेट्रोल २०० रुपयांचे मिळाल्याचे एका ग्राहकाने सांगितले. बंदचा फायदा घेत अनेक पंपचालकांनी ग्राहकांची पिळवणूक केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. पेट्रोल कमी मिळाल्याची तक्रार आणि चौकशीची दखल पंपांवर घेण्यात आली नाही.