शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयाचे लवकरच संकेतस्थळ

By admin | Updated: May 21, 2016 00:44 IST

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु केला

पुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी शुक्ला यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांकही सार्वजनिक केला आहे. यापुढे पाऊल टाकीत पोलीस आयुक्तालयाचे अद्ययावत संकेतस्थळ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे संकेतस्थळ लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्ला यांनी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचे तसेच त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले होते. यासोबतच स्वत:चा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करुन नागरिकांना मोबाईलवर मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप आणि कॉलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांना नागरिक फोन करुन माहितीही देऊ लागले आहेत. सध्या आयुक्तांना दिवसाला साधारणपणे २00पेक्षा अधिक फोन कॉल्स येत आहेत. यासोबतच ६0 ते ७0 मेसेज आणि तेवढ्याच संख्येने नागरिक प्रत्यक्ष भेटत आहेत. संबंधित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपायुक्त, सहायक आयुक्त आणि निरीक्षकांना आदेश दिले जातात. पोलीस आयुक्तांना येणारे फोन कॉल नियंत्रण कक्षाकडे वळवण्यात आले आहेत. दररोज संध्याकाळी नियंत्रण कक्षातले अधिकारी किती फोन आले आणि त्यावर काय उपाययोजना केल्या याचा अहवाल देतात. यासोबतच स्थानिक पातळीवरच उपायुक्तांना नागरिकांनी भेटण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. उपायुक्तांकडूनही भेटणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या तक्रारींचा अहवाल आयुक्तांना दिला जातो. पोलीस आयुक्तालयामध्येही दररोज ६0 ते ७0 नागरिकांना पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद भेटतात. पोलीस चौकी स्तरापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना, नागरिकांच्या सेवेसाठी आपण आहोत याची जाणीव रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्ययावत संकेतस्थळ असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवीन संकेतस्थळाचे काम सुरू करण्यात आले आहे. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त