शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ मराठीकरणास संचालनालयाची असमर्थता

By admin | Updated: June 30, 2014 00:22 IST

महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठीत करण्यात यावीत, ही प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी उच्च शिक्षण संचालनालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठीत करण्यात यावीत, ही प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी उच्च शिक्षण संचालनालयाने फेटाळून लावली आहे. महाविद्यालयांना संकेतस्थळे सुरु करण्यास अनुदान देण्यात येत नसल्याने  संकेतस्थळे मराठीतून करणो जिकिरीचे वाटते, असा शेरा संचालनालयाने मारला आहे. संचालनालयाच्या या भूमिकेला प्रहार विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील विद्यापीठांशी संलगA हजारो महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठी आणि इंग्रजी भाषेत असायला हवीत, अशी मागणी प्रहार संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार टोपे यांनी उच्च शिक्षण संचालकांकडून अहवाल मागवला होता. संचालनालयाने याबाबतचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केला. शासनाकडून महाविद्यालयांची संकेतस्थळे विकसित करण्यास अनुदान देण्यात येत नाही. तसेच विविध माध्यमांच्या भाषांमुळे सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ विकसित करण्यास बंधनकारक करणो जिकिरीचे वाटते, असे या अहवालात उच्च शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
 
राज्यात मराठी भाषेला दिली जाणारी दुय्यम वागणूक प्रहार विद्यार्थी संघटना सहन करणार नाही. संचालनालयाने अहवालात दुरूस्ती करून सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ मराठीत करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अॅड मनोज टेकाडे यांनी दिला आहे.