शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात वेब बेस व मोबाईल अ‍ॅप...

By admin | Updated: May 5, 2017 04:10 IST

रिक्षा- टॅक्सी चालकांनी भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे किंवा गैरवर्तन करणे, हे रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी नित्याचेच झाले आहे

दीप्ती देशमुख / मुंबईरिक्षा- टॅक्सी चालकांनी भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे किंवा गैरवर्तन करणे, हे रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी नित्याचेच झाले आहे. या त्रासातून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी वेब बेस व मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. सध्या याची चाचणी केली जात असून एका महिन्यातच हे प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाणार आहे. वेब बेस अ‍ॅपमध्ये प्रवासी रिक्षा, टॅक्सी किंवा अन्य वाहनांच्या तक्रारी संबंधित आरटीओकडू करू शकतात. तर मोबाईल अ‍ॅपमुळे संकटात असलेल्या प्रवाशाला तातडीने मदत मिळणे सोपे होईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेची सक्ती करणाऱ्या परिवहन विभागाच्या परिपत्रकाला मीरा-भार्इंदर, भिवंडी व अन्य ठिकाणच्या रिक्षा संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शासन अशा प्रकारे भाषेची सक्ती करू शकत नाही, असे म्हणत लॉटरी लागलेल्या मात्र मराठी भाषेत नापास झालेल्यांना परवाना देण्याचा आदेश मार्च महिन्यात उच्च न्यायालयाने सरकारला दिला होता. याच याचिकेच्या सुनावणीत प्रवाशांच्या सुरक्षेचा व रिक्षा, टॅक्सी चालकांच्या गैरवर्तनाचा मुद्दाही उपस्थित झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व चालकांच्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा करत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या पाश्वभूमीवर गुरुवारच्या सुनावणीत परिवहन विभागाने न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले.प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी चालकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी सध्या प्रत्येक आरटीओचे फोन नंबर व ई-मेल आयडी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याशिवाय शासनाने वेब बेस अ‍ॅप आणि मोबाईल अ‍ॅपही विकसित केले आहे. या दोन्ही अ‍ॅपची चाचणी सुरू असून एका महिन्यात ही अ‍ॅप प्रवाशांसाठी सुरू करण्यात येतील. त्याशिवाय 24*7 कॉल सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.‘वेब बेस अ‍ॅपमुळे नागरिक रिक्षा, टॅक्सी चालक व अन्य वाहनांची संबंधित आरटीओकडे तक्रार करू शकतात. तक्रार दाखल केल्यावर संबंधितांना आपोआप अलार्म मिळेल. त्यानंतर वरिष्ठांनाही मिळेल. नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारीचा ट्रॅकही ठेवता येईल. त्यांनी केलेल्या तक्रारींवर काय करण्यात आले आहे, याची माहिती मिळेल व त्यावर त्यांना फीडबॅकही देता येईल. सध्या या अ‍ॅपची चाचणी सुरू असून एका महिन्यात हे अ‍ॅप उपलब्ध होईल,’ असे आश्वासन परिवहन विभागाने उच्च न्यायालयाला दिले आहेत.संकटात असलेल्या प्रवाशाला तत्काळ मदतराज्य सरकारने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपमुळे संकटात असलेल्या प्रवाशांना तत्काळ मदत मिळणार आहे. एसओएस अ‍ॅपद्वारे संकटात असलेल्या प्रवाशाने अ‍ॅपमधील एक बटण दाबले की जवळच्या पोलीस ठाण्याला एसएमएस किंवा कॉल जाईल. त्यामुळे पोलीस संकटात असलेल्या प्रवाशाला तत्काळ मदत करू शकतील. त्याचबरोबर परिवहन विभागाशी संबंधित सेवांची माहिती मिळवण्यासाठी किंवा रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी 24*7 कॉल सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन विभागाने खंडपीठाला दिली.