शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

By admin | Updated: December 22, 2015 01:13 IST

थंडी गायबच : मोहोर प्रक्रियाही यंदा उशिराच

रत्नागिरी : डिसेंबर संपत आला तरी हवामानामध्ये फारसा बदल झालेला नाही. थंडी गायब असल्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे यावर्षीचा हंगाम लांबणार असल्याची भीती निर्माण होत आहे.यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा निम्मा झाल्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. काही ठिकाणी पालवी जून झाली आहे. तरीही काही झाडांना अद्याप पालवीची प्रक्रिया सुरूच राहिली आहे. कडक पालवी झालेल्या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. आतापर्यंत जेमतेम ३० टक्के झाडांना मोहोर आला आहे. ७० टक्के झाडे मोहोराशिवाय आहेत.नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी सुरु झाली, तर येणाऱ्या मोहोरामुळे होणारी फळधारणा त्यामुळे आंबा मार्चअखेर बाजारात येतो. परंतु डिसेंबर संपत आला तरी मोहोर नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्याचा पहिला मोहोर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. परंतु यावर्षी मोहोरच कमी प्रमाणात असल्यामुळे पिकाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहोरच व्यवस्थित आला नसल्यामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता आहे. आलेल्या मोहोराला किरकोळ फळधारणा आहे. कणीपासून बोरांच्या आकाराएवढी फळे लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने वातावरणातील बदलामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचे वाढते दर, मजुरी, इंधन आदी कारणांमुळे आंबापीक घेणे शक्य होत नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जानेवारी जवळ आला तरी व्यवस्थित मोहोर न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:च्या कलमांबरोबरच इतर शेतकऱ्यांची कलमे कराराने घेऊन आंबा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे कराराने कलमे घेतल्यानंतर ठरलेले पैसे द्यावे लागतात. परंतु गेली दोन वर्षे उत्पन्नच अल्प आल्याने संबंधित शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावर्षी अद्याप थंडीचे प्रमाण नसल्यामुळे पोषक हवामान आंब्याला उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यावर्षीचा हंगामदेखील शेतकऱ्यांना चिंतेचा ठरणार अशीच चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)ऋतुमान बदलले : थंडीचा मोसमही लांबलायावर्षी सर्वच ऋतुमान बदलल्याने त्याचा परिणाम हापूसच्या पिकावर होणार हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. नोव्हेंबरपर्यंत अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे लांबलेली थंडी या साऱ्या वातावरणात यंदा हापूस उशिरा येण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.