शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यांवर हमरीतुमरी, रुग्णालयांचा असहकार

By admin | Updated: November 10, 2016 06:31 IST

चलनातून अचानक बाद केलेल्या १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास खारेगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने तेथे बुधवारी सकाळी

ठाणे : चलनातून अचानक बाद केलेल्या १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास खारेगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने तेथे बुधवारी सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाणे रेल्वे स्थानक आणि शहरातील पेट्रोलपंपांवर याच नोटांमुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात खटके उडत होते. शहरातील अनेक खासगी रुग्णालये व डॉक्टर यांनी नोटा स्वीकारायला नकार दिल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांचे अतोनात हाल झाले.खारेगाव, आनंदनगर व मुलुंड चेकनाक्यालगत असलेल्या टोलनाक्यांवर या नोटा घेण्यास नकार देण्यात आल्याने सकाळी कार्यालयाकडे निघालेले मोटारचालक आणि कर्मचारी यांचे खटके उडत होते. खारेगाव टोलनाक्यावर तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी अनुभवाला आली. दुपारनंतर टोलनाक्यावर या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती निवळली.बुधवारी बँका बंद असल्याने सुटे पैसे मिळावे, याकरिता रेल्वे प्रवाशांनी ठाणे स्थानकातील रेल्वे तिकीटघरांसमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. परंतु, खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात सुटे पैसे नसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत होते. वाद वाढल्याने रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. इस्पितळे व मेडिकल दुकानांत या नोटा चालणार, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. परंतु, बहुतांशखासगी रुग्णालयांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. खासगी दवाखान्यांत पाऊल ठेवताच तेथील रिसेप्शनिस्ट रुग्णांच्या नातलगांना डॉक्टर रद्द झालेल्या नोटा स्वीकारणार नाहीत, असे बजावत होत्या. त्यामुळे रुग्णांची चांगलीच पंचाईत होत होती. या पेचातून मार्ग काढण्याकरिता रुग्णांच्या नातलगांना औषधे आणण्याकरिता मेडिकल दुकानात पिटाळले जात होते. तेथे सुटे पैसे मिळाल्यावर डॉक्टरांची फी दिली जात होती. मेडिकल दुकानांकडील सुटे पैसे संपल्यावर त्यांनी तुमचे १००० रुपये जमा आहेत. उरलेल्या रकमेची औषधे नंतर लागतील, तशी घेऊन जा, असे सांगण्यास सुरुवात केली.पेट्रोलपंपांवरही अशीच गोंधळाची स्थिती होती. या नोटा तेथे स्वीकारल्या जातील, असे मोदींनी जाहीर केले असल्याने मोटारी, दुचाकी यांच्या रांगा पंपांवर लागल्या होत्या. लीटर-दोन लीटर पेट्रोल टाकायला गेलेल्यांना पंपावरील कर्मचारी हाकलून देत होते. मोटारीत हजार-पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकायचे तर टाका नाहीतर निघा, अशी उर्मट भाषा कर्मचारी करीत असल्याने प्रवासी व कर्मचारी यांच्यात हमरीतुमरीची वेळ आली. खालापूर टोलनाक्यावर तारांबळ...वावोशी : पाचशे व हजारच्या नोटा बंदीचा निर्णय केंद्र शासनाने पूर्वकल्पना न देता अचानक घेतल्याने बुधवारी सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडालेली दिसली. यामध्ये मुंबई-पुणे प्रवास करणारेही सुटले नाहीत. मुंबई- पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर पाचशे व हजारची नोट घेत नसल्याने या टोलनाक्यावर काही तास लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचा खोळंबा झाल्याने टोलनाका प्रशासन व प्रवासी यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता.तणावानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर सुटे पैसे नसल्यास त्यांना मोफत सोडण्यात आले तर सुटे पैसे देणाऱ्यांकडून पैसे घेण्यात येत असल्यानेही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कुणालाही मोफत सोडण्यात आले नाही. पैसे सुटे नसणाऱ्या वाहनचालकांना बाजूला घेऊन पैसे सुटे झाल्यानंतर पैसे घेऊन सोडण्यात आले, तसेच आमच्याकडे पैसे सुटे नसल्यास पाचशे, हजार रु पये घेतले जातात मात्र सुट्या पैशांची अडचण आमच्याकडेसुद्धा आहे, असे खालापूर टोलनाक्याचे आयआरबी प्रशासकीय अधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले.