शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाजपा-सेनेसोबत जाणार नाही - तटकरे

By admin | Updated: March 3, 2017 06:05 IST

आमचे शिवसेना आणि भाजपाशी कोणतेही अंडरस्टँडिंग नव्हते.

मुंबई : आमचे शिवसेना आणि भाजपाशी कोणतेही अंडरस्टँडिंग नव्हते. शिवाय, आमच्यात कोठेही मैत्रीपूर्ण लढतही झाली नाही. आमची भूमिका आम्ही निवडणुकीआधीच स्पष्ट केली होती व ती आम्ही पाळली, पण काँग्रेसने उस्मानाबाद, रायगडमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी केली. आजही भाजपा-सेनेसोबत जाण्याचा कोणताही विचार आमच्यात नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.शिवसेना युतीमधून बाहेर पडली आणि सत्ता सोडून देईल याची कोणतीही आशा आपल्याला नाही, उलट आपण त्याच दिवसाची वाट पाहत आहोत, मात्र सेनेला सत्तेचा मोह सुटत नाही, असेही तटकरे या वेळी म्हणाले. भाजपा-शिवसेनेची युती होईल, यावर आपला विश्वास आहे, कारण आता तरी निवडणुकांची कोणतीही शक्यता वाटत नाही, असेही तटकरे पुन्हा म्हणाले. खिशात राजीनामे आहेत असे दाखवणाऱ्यांच्या राजीनाम्यावरची शाई उडून गेली असेल किंवा एवढे दिवस राजीनामे खिशात ठेवले की फाटून जातात, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. फक्त ‘सामना’मधून भाजपाच्या विरोधात लिखाण करून काही होत नाही, त्यासाठी पाठिंबा काढून घेण्याची हिंमत दाखवावी लागते. अविश्वास ठराव आणण्याची गोष्ट काँग्रेसमधून कोणी सुरू केली याची माहिती आपल्याला नाही. याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही तटकरे या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)