शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

इट का जवाब हम पत्थरसे देंगे !

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

राजनाथ सिंग : साताऱ्यातील सभेत पाकला ठणकावले

सातारा : ‘भारत देवभूमी आहे. आमच्या देवभूमीवर कोणी वाईट नजर ठेवत असेल, तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही आणि पडलीच तर आम्ही शांत बसणार नाही,’ असे सांगतच ‘पाकिस्तानने त्यांचे नापाक इरादे थांबविले नाही तर ‘इट का जवाब हम पत्थरसे देंगें’ असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज, गुरुवारी सातारा येथे पाकिस्तानला दिला.‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथील गांधी मैदानावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची सभा झाली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मात्र, याचवेळी महाराष्ट्र फक्त अन्याय आणि अत्याचार तसेच घोटाळ्यांत नंबर वन असल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले.राजनाथ सिंग म्हणाले, ‘ज्यावेळी सीमेवर गोळीबार होत असताना त्याचे राजकारण होत आहे. मात्र, राजनीतीमध्ये असणारा ‘नीती’ शब्द विरोधकांनी विसरू नये. देश संरक्षणार्थ ‘अनीती’ नको तर ‘नीती’ हवी आहे. भारताला यापुढे कोणासमोर मान झुकवावी लागणार नाही, असे काम आम्ही करत आहे. पाकने गोळीबार सुरू केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. मात्र, आम्ही विरोधकांना सांगू इच्छितो की, देशाची हवा आता बदलली आहे. पाकविरोधात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी सूचना आणि आदेश देत आहेत. आपले सीमा सुरक्षा दल पाकचा सामना करण्यास सक्षम आहे. पाकने यापुढे खुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना र्इंट का जवाब पत्थर से देण्यास तयार आहे.’राजनाथ सिंह यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार आगपाखड केली. ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे वाटोळे केले. हे फक्त महाराष्ट्र नंबर वनचा दावा करतात. मात्र, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, घोटाळे, महिला अत्याचार यामध्ये नंबर वन आहेत. राज्यात १३६२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्र नंबर वन कसा, याचे उत्तर द्यावे लागणार आहे.’ राजनाथ सिंह म्हणाले, ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हेतर जगाची आर्थिक राजधानी आहे. तिचा आपल्याला खेळ करायचा नाही. महाराष्ट्रातील राजकीय मंडळी कोणताही आरोप झाला की कोणीही खुर्ची सोडायला तयार नाही. आम्हाला हे बदलायचे आहे. त्यामुळे भाजपला साथ करा.’मराठीतून सुरुवात...केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सभामंचकावर आल्या-आल्या सर्वांना हात उंचावून अभिवादन केले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये प्रथमच येत आहे. मी धन्य झालो. मला मराठी बोलता येत नाही; मात्र थोडा बहुत मराठी समज लेता हूँ’ अशी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आता ‘मेड इन इंडिया’राजनाथ सिंग यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करीत असतानाच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे कौतुकही केली. ते म्हणाले, ‘विज्ञान तंत्रज्ञानात भारत आघाडी घेत असल्यामुळे उद्योगक्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. आता यापुढील काळात भारतात चायना मेड, अमेरिका मेड, जपान मेड उत्पादने मिळणार नाहीत, तर ती ‘मेड इन इंडिया’ उत्पादनेच मिळणार आहेत.