शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे...!

By admin | Updated: September 11, 2016 04:00 IST

मी देवळात नाही़ मी सर्वत्र आहे. अगदी झाडातही मी आहे..., असा संदेश देत, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या तरुणांनी चक्क कडुनिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे़

शिवाजी सुरवसे,  सोलापूरमी देवळात नाही़ मी सर्वत्र आहे. अगदी झाडातही मी आहे..., असा संदेश देत, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या तरुणांनी चक्क कडुनिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे़ वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा इको फें्रडली गणपती उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे़ मोडनिंबमधील रेल्वे स्टेशन रोडवर संगनबसवेश्वर मठाजवळ लष्कर ए शिवबा प्रतिष्ठान संचलित वीर मराठा गणेशोत्सव मंडळाने ही गणेशाची मूर्ती बसविली आहे़ ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. वृक्ष हेच जीवनात सर्व काही आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे़ गतवर्षी या मंडळाने बाबूंच्या कामठ्यांपासून बाहुबली स्टाईलमध्ये दहा फुटांची गणपतीची मूर्ती बसविली होती़ दरवर्षी काहीतरी नवीन करणे आणि पर्यावरण जागृतीचे काम करणे हा उद्देश मंडळाने ठेवला आहे़ संतोष लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान घाडगे, जगदीश डांगे, रणजित सुरवसे,किरण व्यवहारे, विजय परबत, धनाजी लादे, सोमनाथ माळी,शीतल महाडिक, विजय बुरांडे, स्वाधीन थोरात यांच्या सहकाराने ही कल्पना मूर्त रूपात आल्याचे केदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़