शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घोकंपट्टीपेक्षा ज्ञान देणारे शिक्षण हवे

By admin | Updated: February 22, 2016 04:14 IST

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असते. त्यामुळे त्यांना निव्वळ घोकंपट्टीकडे न नेता, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील, तेव्हा

- राजेंद्र दर्डा यांची अपेक्षा

पुणे : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असते. त्यामुळे त्यांना निव्वळ घोकंपट्टीकडे न नेता, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील, तेव्हा त्याच्यातील कुतूहल, जिज्ञासा, निरीक्षणशक्ती विकसित कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीव्यक्त केली. ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘शिक्षणसंवाद’ परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे स्वागत करून, दर्डा म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटांतील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अभिप्रेत आहे. एका बाजूला पालिका व नगरपालिकेच्या शाळा ओस पडत असताना, बीड जिल्ह्यात अशाही काही शाळा आहेत, ज्या रविवारीही सुरू असतात. नक्षलग्रस्त भागतही नवनवीन प्रयोग होत आहेत. अशा प्रयोगांचे आदान प्रदान होण्याची आवश्यकता आहे. आज पहिली ते बारावीचा विचार केला, तर १ लाख ३ हजार शाळा, २ कोटी १७ लाख विद्यार्थी, ६ लाख ८७ हजार शिक्षक आहेत. फक्त शालेय शिक्षणावर जवळपास ३० हजार कोटी खर्च आहे. एवढा खर्च युरोपातील काही देशांचा विचार केला तर या देशांचे बजेटही एवढे मोठे नाही. एखादा विद्यार्थी नांदेड किंवा औरंगाबाद विद्यापीठातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आला, तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे एकच अभ्यासक्रम ठेवता येईल का? शाळांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांना घोकंपट्टीकडे न नेता, त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यातील कुतूहल, जिज्ञासा निरीक्षणशक्ती विकसित कसे होईल, याकडे लक्ष द्यावे; तसेच विद्यापीठातून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संगणक साक्षरता आणि इंग्रजी भाषा कौशल्य, आर्थिक साक्षरता आणि समाजातील निरनिराळ्या घटकांबरोबर कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.