शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

१०० दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

By admin | Updated: February 10, 2015 00:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही

युती सरकार क्रियाशील : भाजप नेत्यांचा दावानागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही अशाच वेगाने सरकार निर्णय घेईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. युती सरकारने १०० दिवसात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेची धुरा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सांभाळली असली तरी महापौर, जि.प. अध्यक्ष यांच्यासह जवळपास सर्वच आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस दररोज १६ तास काम करतात. सर्व मंत्रीही पूर्णवेळ काम करीत आहेत. कुठल्याही सरकारचे मूल्यमापन करण्यासाठी १०० दिवसांचा कालावधी हा अत्यल्प आहे. मात्र, या कमी काळातही युती सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. सध्या ४० हजार गावांपैकी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. सरकारने राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले आहेत. डावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मान मुख्यमंत्र्यांना मिळाला. यातून उद्योग व कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे सर्व विकास आराखड्यांना तातडीने मंजुरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महानगरांच्या विकासासाठी विकास समिती स्थापन केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, रमेश मानकर, प्रकाश टेकाडे, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)विदर्भात ३० लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्यभाजप देशात १० कोटी सदस्य करणार आहे. यापैकी महाराष्ट्रात एक कोटी सदस्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. रविवारपर्यंत ५२ लाख ७० हजार ३२१ सदस्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. विदर्भात ३० लाख सदस्य नोंदणी होणार असून, ९.५० लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत अभियान चालणार असून, १० व ११ फेब्रुवारी रोजी प्रत्येक बूथ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे गिरीश व्यास यांनी सांगितले.