शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोटींबरोबर आम्हालाही कापा

By admin | Updated: November 7, 2016 06:36 IST

तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती

वसई/पारोळ : तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती महामार्ग रविवारी सुमारे दोन ते अडीच तास रोखून धरला. आमच्या बोटींबरोबर आम्हालाही कापा, असा आग्रह हे आंदोलक करीत होते. महसूल विभागाकडून बोटी व सक्शन पंप बंद असतानाही केवळ ते नदी पात्रात आहेत म्हणून कारवाई करून तोडण्यात आले. असे न करता जे सक्शन पंप व बोटी रेती उत्खनन करताना आढळतील त्यांच्यावरच कारवाई करावी. पंप आणि बोटी नदीत अथवा खाडीत ठेवायच्या नाहीत, अशी प्रशासनाची भूमिका असेल तर आम्हाला त्या सुरक्षित जागी हलविण्यास वेळ द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व विभागातील माजी खासदार बळीराम जाधव यांनी केले. या वेळी जि.प. सदस्या कल्याणी तरे, नगरसेविका रमा किणी, टीडीसी बँक संचालक राजेश पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने भूमिपुत्र यात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.खानिवडे बंदरात बोटी व सक्शन पंप तोडण्यास सकाळी सुरुवात झाली. या बंदरात महिनाभरापासून रेती उत्खनन बंद आहे, त्यामुळे ही कारवाई योग्य नसल्याचा दावा करून कोपर, खानिवडे, खराट, तारा व आसपासच्या गावांतील भूमिपुत्रांनी एकत्र येऊन महामार्ग रोखला होता. आंदोलकांच्या मागणीचा विचार करून वरिष्ठ पातळीवरील चर्चेप्रमाणे कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचे वसई प्रांत क्षीरसागर यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)