शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘हम करे सो कायदा’ फार काळ टिकत नाही

By admin | Updated: January 22, 2017 04:50 IST

भाजपा सरकार आल्यापासून असहिष्णुतेचा मुद्दा पुढे आला. यावरुन अनेकांनी पुरस्कार परत केले. स्वत:चाच चेहरा कसा पुढे येईल, मीच लोकांपुढे गेलो पाहिजे, असा केविलवाना प्रयत्न

पिंपरी : भाजपा सरकार आल्यापासून असहिष्णुतेचा मुद्दा पुढे आला. यावरुन अनेकांनी पुरस्कार परत केले. स्वत:चाच चेहरा कसा पुढे येईल, मीच लोकांपुढे गेलो पाहिजे, असा केविलवाना प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत. अशी भुमिका गेल्या सत्तर वर्षात इतर कुठल्याही पंतप्रधानांनी घेतली नव्हती. हम करे सो कायदा, मी करेल तीच पूर्वदिशा, ही भुमिका घेणारे फार काळ टिकत नसतात. हिटलर, सद्दाम हुसेन यांना कधी यश आले नाही. ते अपयशीच झाले. खरे काय अन् खोटे काय, हे समोर आल्यावर सर्व स्पष्ट होते. अशा राजकारणापासून सावध राहायला हवे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी थेरगाव येथे केले. शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसच्या वतीने थेरगाव येथे आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, शिक्षणात मक्तेदारी निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे. तर आरएसएसचे लोक आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करतात, असे त्यांच्या मनात येतेच कसा? या सरकारची भुमिका कामगारविरोधी तसेच सर्वधर्मसमभावाची नसून मनुवादी व मूठभर लोकांचा विचार करणारी आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसच्या पदाधिकारयांनी जबाबदारीने वागायला हवे. एखाद्या महाविद्यालयात गेल्यास ‘लाईनी’ मारायच्या भानगडीत पडू नका, तसे काही करायचे असेल तर आधी करुन घ्या अन् मग संघटनेत नेमणुका देतो, असे पवार यांनी नमूद करताच हशा पिकला. आम्हीपण तुमच्या काळामधून गेलेलो आहे.महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेतला अन् त्यानंतर जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हीही सामंजस्याने वागा, असा सल्ला पवार यांनी दिला.