शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडे अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते! - मुश्ताक वाणी

By admin | Updated: July 8, 2017 04:11 IST

काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत साहाय्यासाठी आम्ही नेहमीच पुढे होतो. तरीही आमच्याकडे कायम अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते. प्रत्येक वेळी देशभक्ती आणि निष्ठा सिद्ध करण्याची सक्ती आमच्यावर केली जाते, अशी खंत श्रीनगर येथील काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मुश्ताक वाणी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘काश्मीर, ए डायलॉग फॉर पीस अ‍ॅण्ड इंटिग्रेशन’ या एकदिवसीय परिसंवादात ते बोलत होते.काश्मीरबाबत सतत नकारात्मक बातम्या पसरविल्या जातात. त्यामुळे लेह, लडाख, जम्मूच्या तुलनेत केवळ १० टक्के पर्यटक काश्मीरकडे येतात. बडे उद्योजकही येथे उद्योग उभारण्यास धजत नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी येथील तरुणांना केवळ शासकीय नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, असेही वाणी म्हणाले. या परिसंवादात बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील मराठमोळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, काश्मीरमध्ये काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी, सद्भावना संस्थेचे संजय भावसार, सरहद संस्थेचे संजय नहर आदी सहभागी झाले होते.प्रशासनाची कार्यक्षमता गरजेची - डॉ. डोईफोडेआपल्याला वाटते त्यापेक्षा काश्मीरमधील परिस्थिती पूर्ण वेगळी असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी या वेळी सांगितले. येथे काम करताना कोणतेही दडपण नाही. मात्र नागरी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे चित्र आहे. ते पालटण्यासाठी अधिक कार्यक्षम प्रशासनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.