शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आषाढीसाठी आम्ही सज्ज : विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: June 23, 2017 18:32 IST

-

आॅनलाइन लोकमत पंढरपूर दि 23 -  आळंदीपासून मी आमच्या सहकाऱ्यांसह सायकल वारी करीत पालखी विसावा व मुक्कांच्या ठिकाणांची पाहणी, बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. ४ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच हायटेक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून एकूण सहा हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील़ शिवाय विविध फोर्सही बंदोबस्तासाठी कार्यरत असतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली़ आषाढी वारीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी त्यांनी घेतला़

त्यानंतर पत्रकारांना पोलीस बंदोबस्ताबद्दल सविस्तर माहिती देताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, वाहतुकीस अडथळा करणारे हॉकर्से, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे़ दहशतवादी हल्ले हे वाहनांच्या माध्यमातून होत असल्याने आम्ही वाहनांची कसून तपासणी करणार आहोत़ शिवाय लॉज, धर्मशाळा, हॉटेल यांची तपासणी करण्यात येत आहे़ नदीपात्रात वाळू उपशामुळे जे खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ ठिकठिकाणी बॅरेकेटिंग लावण्यात येणार आहे़ वारीदरम्यान महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्पेशल स्कॉड तैनात केले आहेत़ भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी त्यांना ओळखणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ ते सध्या पालख्यांसोबत आहेत़ यंदाच्या वारीसाठी पूर्ण तयारीनिशी पोलीस कार्यरत असतील, असे त्यांनी सांगितले़

आळंदीपासून सायकल वारी केली़ यामुळे पालखी विसावा आणि मुक्काच्या ठिकाणाची पाहणी करता आली़ तेथील नगराध्यक्ष, सरपंच आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत़ सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील पुलावरील कठडे नादुरस्त आहेत़ शिवाय तेथे अश्लिल काहीतरी लिहिले आहे़ ते पुसून कठडे दुरुस्तीबाबतची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे़

पंढरपुरात वारीदरम्यान रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात भाविकांची लूट होते, मात्र यावेळी तसे होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे़ एकूणच आषारी वारीसाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

असा असेल पोलीस बंदोबस्त आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ७ अप्पर पोलीस अधीक्षक, १४ पोलीस उपअधीक्षक, ५९ पोलीस निरीक्षक, २०३ पोलीस उपनिरीक्षक, २७ महिला पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार २१५ पोलीस कर्मचारी, ५५५ महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे ५० कर्मचारी तसेच वाहतूक शाखेसाठी ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप-निरीक्षक, ४२० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक तसेच पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सी. सी. ट़ व्ही़ कॅमेरे व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. तसेच शहरात तीन झोन तयार करण्यात येणार आहेत़ एस़ आऱ पी़ एफ़ च्या ३ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार ४०० पुरुष होमगार्ड तर २०० महिला होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय, आरोग्याची काळजीही घेतली जाणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.