शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जगात भारी आम्ही कोल्हापुरी

By admin | Updated: June 27, 2017 01:31 IST

काय भावा कवा येनार हाईस... हे फोनवरून मित्राचे रांगडी शब्द कानावर पडले आणि झरझर डोळ्यांसमोर आठवणी झरू लागल्या त्या माझ्या आजोळच्या. छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीच्या

काय भावा कवा येनार हाईस... हे फोनवरून मित्राचे रांगडी शब्द कानावर पडले आणि झरझर डोळ्यांसमोर आठवणी झरू लागल्या त्या माझ्या आजोळच्या. छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीच्या, कुस्तीवीरांच्या पंढरीच्या, साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर नगरीच्या म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या. का जावं कोल्हापूरला? काय आहे तिथे? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन कोल्हापूरला नेहमी जातो; पण येताना खूप साऱ्या सुखद आठवणी घेऊन परतीचा प्रवास करतो. इथल्या माणसांपासून दगडधोंड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींत निराळेपण ठासून भरलंय. महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारं महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर जसं भक्तांना देवीच्या दर्शनाच्या ओढीनं आपल्याकडं खेचून घेतं तसंच ते स्थापत्यशास्त्रज्ञांना स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून आकर्षित करतं. महालक्ष्मीच्या म्हणजेच आंबाबाईच्या मंदिरात नवरात्र उत्सवात जाणं म्हणजे पर्वणीच. आजही राजेशाही थाटात होणारा दसरा महोत्सव एकदातरी प्रत्येकाने पाहावाच. या ऐतिहासिक नगरीत शालिनी पॅलेस, नवा राजवाडा, भवानी मंडप यांसारख्या अनेक छत्रपतीकालीन वास्तू मोठ्या थाटात आणि तितक्याच सुस्थितीत आपल्या भक्कमतेचा पुरावा देत डामडौलात उभ्या आहेत. इथे आल्यावर पाहिलाच पाहिजे तो ‘रंकाळा तलाव’ आणि आत्ताची कोल्हापूरची चौपाटी. कोल्हापुरात गेलात तर शहरापासून काही अंतरावर असणारा शिव छत्रपतींच्या थरारक इतिहासाची आणि शौर्याची गाथा सांगणारा पन्हाळगड पाहायला विसरू नका. बाजी प्रभूंच्या पराक्रमाची साक्ष असणारी पावनखिंड आणि जवळचा विशाळगडसुद्धा तुम्हाला इतिहासाची उजळणी करून देईल. कोल्हापूरच्या पर्यटनाचा मुख्य भाग असलेल्या राधानगरीच्या अभयारण्यात मुक्त संचार करणारे अगडबंब गवे जवळून पाहताना अंगावर काटा येतो. अन्य प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील. अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, अनुभवता येतील. यासाठी तरी एकदा कोल्हापूरला जाऊनच या. येताना सुमधुर आठवणींबरोबर आंबाबाईचा आशीर्वाद नक्कीच घेऊन याल आणि ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ असं कोल्हापूरकर का म्हणतो याची प्रचिती येईल. - निशांत प्रल्हाद विद्या सरदेसाई