शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘आम्ही सारे पानसरे’

By admin | Updated: March 3, 2015 00:33 IST

पानसरेंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या : कोल्हापुरात विद्यार्थ्यांची मोर्चाने मागणी

कोल्हापूर : ‘कॉमे्रड पानसरे अमर रहे’, ‘मारेकऱ्यांना त्वरित पकडा व फाशी द्या’ आदी मागण्यांकरिता कोल्हापुरातील तीन हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सोमवारी शहराच्या मुख्य मार्गावरून मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मोर्चात ‘आम्ही सारे पानसरे’ या लालटोप्या घातलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात महाराष्ट्र हायस्कूल येथे ‘आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा चालवू’ अशी प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. त्यानंतर मोर्चास सुरुवात करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांच्या हाती ‘शाहूंच्या भूमीत भ्याड हल्ल्याचा निषेध’, ‘हिंदू-मुस्लिम-शीख, इसाई हम सब भाई-भाई’, ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवाद झिंदाबाद’, ‘लढेंगे जितेंगे’, ‘आगे और लढाई हैं’, ‘अब लढाई आरपार’, ‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलरकी मौत मरेगा’ या फलकांनी व ‘आम्ही सारे पानसरे’ या लाल टोप्या परिधान केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांच्या ‘मारेकऱ्यांना त्वरित पकडून फाशी द्या व कॉमे्रड पानसरे अमर रहें’ या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. (प्रतिनिधी)२0 शाळांचा सहभागकोल्हापूर शहरांतील २० प्रमुख शाळांमधील ८ वी व ९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. मारेकऱ्यांना त्वरित पकडा अन्यथा लढा तीव्र करू गेली चौदा दिवस केवळ तपासच सुरू आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही पकडलेले नाही. त्यांना शोधून तत्काळ फाशी द्या, अन्यथा याहीपेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करू .- डी. बी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ