शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदाचा ‘बाबासाहेब’ प्रदर्शनाच्या वाटेवर

By admin | Updated: August 4, 2016 02:41 IST

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संघर्षमय कहाणीचा सार बाबासाहेब या चित्रपटात दिसून येणार आहे.

वसई : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संघर्षमय कहाणीचा सार बाबासाहेब या चित्रपटात दिसून येणार आहे. वसईतील हर्षदा बामणे ही या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्ण झाले असून, नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजात बाबासाहेबांच्या जीवनावरील एक जबरदस्त पोवाडा नुकताच संगीतबद्ध करण्यात आला.रायझिंग लोटस फिल्म हाऊस निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण तांबे आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे.चित्रीकरणाची बाजू हर्षल सुपोस्कर यांनी सांभाळली आहे.निर्माते सत्यवान गावडे आणि सहनिर्माता बाळकृष्ण पाटील यांच्या या चित्रपटाला डॉ. बामणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. व्यवस्थापनाची बाजू पूनम घोरपडे हिने सांभाळली आहे.परदेशी अभिनेत्री सॅमी आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या दोन बड्या स्टार्ससोबत महत्तपूर्ण भूमिका हर्षदा करीत आहे. बाबासाहेब चित्रपट समाजातील सर्वच घटकांना अंजन घालणारा आहे. हा चित्रपट एक माहितीपटही नाही आणि करमणूकप्रधानही नाही. एक आगळीवेगळी कथा असलेल्या या चित्रपटात ग्रामीण भागाच्या विलोभनीय दृश्याबरोबरच मागासलेल्या विचारसरणीचेही दाहक चित्रण पाहता येईल आणि त्यामुळेच तो सर्वांना नक्कीच आवडेल, अशी आशा हर्षदाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी) >महाविद्यालयातून लहानसहान एकांकिका करताना या चित्रपटातील भूमिकेसाठी हर्षदाला आॅर्डर आली. बी.एस.सी.चे शिक्षण घेत असताना तिने या चित्रपटातील आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आणि दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांच्याबरोबर अभिनय करताना ती डगमगली नाही. त्यामुळे तिचे बाबासाहेब टीमकडून कौतुक करण्यात आले आहे.