शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीकेपीएस आर्किटेक्चर कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 14, 2017 01:19 IST

भारतीय कला प्रसारणी सभेच्या (बीकेपीएस) कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्रथम वर्षाचे प्रवेश कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने थांबविले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील नावाजलेल्या आर्किटेक्चर महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या भारतीय कला प्रसारणी सभेच्या (बीकेपीएस) कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्रथम वर्षाचे प्रवेश कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने थांबविले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाची बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण उपलब्ध करून देणारे हे महाविद्यालय बंद होऊ नये, अशी भावना महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची स्थापना होण्यापूर्वी म्हणजेच १९५४ मध्ये महाविद्यालय सुरू झाले. राज्यात केवळ तीन अनुदानित महाविद्यालये आहे. त्यात मुंबईमधील जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर, रचना संसद आणि पुण्यातील टिळक रस्त्यावरील बीकेपीएस कॉलेज आॅफ आर्किटेक्चर या महाविद्यालयांचा समावेश आहे. पुरेशा जागा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यातही गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क भरणे शक्य नसते. राज्यातील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांमधून केवळ ४० विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातील ५ वर्षांच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो; मात्र, आर्किटेक्चर कौन्सिलच्या समितीने केलेल्या पाहणीत त्यांना महाविद्यालयात काही त्रुटी अढळून आल्या. परिणामी, कौन्सिलकडून महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्यात आले.>अपुरी जागा, प्राध्यापकांची संख्या कमी महाविद्यालयाकडे उपलब्ध जागा अपुरी असून, प्राध्यापकांची संख्याही कमी आहे, असे कारण सांगून कौन्सिलने महाविद्यालयाचे प्रवेश थांबविले आहेत. मात्र, कौन्सिल स्थापन होण्यापूर्वी महाविद्यालय सुरू झाले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर कौन्सिलने नियम तयार केले आहेत. परिणामी नंतर तयार केलेल्या नियमानुसार महाविद्यालयाला जागा वाढवता येणे शक्य नाही. तसेच, शासनाकडूनच प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी मान्यता दिली जात नसल्याने प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. जागा कमी असताना व प्राध्यापकांची संख्या कमी असताना महाविद्यालयाचा निकाल चांगला आहे. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.>आर्किटेक्चर कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यातील एकमेव अनुदानित आर्किटेक्चर महाविद्यालयामधील प्रवेश थांबविण्यात आले आहेत. तंत्र शिक्षण विभागाने प्रवेश रोखले नाहीत. कौन्सिलने प्रवेशास मान्यता दिली, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.- डॉ. दिलीप नंदनवार, सहसंचालक, तंत्र शिक्षण, पुणे विभाग>महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. तसेच, महाविद्यालयाकडे उपलब्ध असणारी जागा अपुरी आहे. हे कारण सांगून कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने यंदा प्रथम वर्षात प्रवेश थांबविले आहेत. त्यामुळे अनुदानित महाविद्यालय असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश देता आले नाही.- पुष्कर कानविंदे, प्राचार्य, बीकेपीएस, कॉलेज आॅफ आर्किटेक्चर