शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

By admin | Updated: June 20, 2016 05:29 IST

लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला.

‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपलेमुंबई : लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला. सत्तेसाठी आम्ही कधी लाचार झालो नाही की कधी वेडीवाकडी तडजोड केली नाही. स्वाभिमानाने युती करू, पण त्यासाठी लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्र (एनएसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेत उद्धव यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले, पण शिवसेना मागे हटली नाही. शिवसेनेवर बंदी आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. गुंडांची टोळी, प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला हिणवले गेले; पण हेच गुंड प्रसंगी धाऊन आले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर आज स्वत:ला ‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपून बसले होते. पण बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख खंबीरपणे उभे राहिले. मुंबईतील दंगलीच्या काळातही शिवसेनेचे वाघच हिंदंूच्या रक्षणासाठी धावून आले, याची आठवणही त्यांनी करून दिली.सध्या भाजपा-शिवसेनेत सुरू असलेली ‘तू तू मैं मैं’ आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एनएसईच्या प्रांगणात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)जमिनीवर रहा; गडकरींचा मंत्र्यांना सल्लापुणे : मंत्रिपदात काही अर्थ नाही. पद गेले की सगळे संपते; कार्यकर्ता कधी संपत नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, असा वडीलकीचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरील मंत्र्यांकडे बघत दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या या ‘लेकी बोले सुने लागे’ उक्तीची जोरदार चर्चा रंगली.भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीचा समारोप रविवारी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्वमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. खुमासदार शैलीत गडकरी म्हणाले, सत्ता नसली की व्यवस्थित असते. सत्ता आली की कलह सुरू होतात. तसे करू नका, ध्येय लक्षात ठेवा. आपला पक्ष वेगळा आहे. यात कधीही कोणाच्या मनासारखे होत नाही; माझ्याही झाले नाही, असे म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यामुळे हशा पिकला. (प्रतिनिधी)खसखस मंत्री आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, याचा किस्सा सांगत असताना गडकरी यांनी ‘काय, बरोबर आहे ना,’ असे थेट दानवे यांना विचारले, तेव्हाही सभागृहात खसखस पिकली.अच्छे दिन आले की येणार? केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘देश बदल रहा हैं’ अशी जाहिरातबाजी केली जात आहे. त्याचा उल्लेख करीत उद्धव म्हणाले, की देश बदल रहा है म्हणता, पण परिस्थिती कुठे बदली? अच्छे दिन आले की येणार आहेत, हे माहीत नाही. महागाईत सर्वसामान्य जनता पिचून निघाली आहे. तेव्हा आधी महागाई नियंत्रणात आणा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.एकहाती सत्ता आणण्याची धमक : मुंबईसह नऊ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत स्वाभिमानाने युती होणार असेल तरच करू अन्यथा एकहाती सत्ता आणण्याची धमक आमच्यात आहे. तेव्हा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन करीत उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.