शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वावेस होम्सला दोन भागीदारांसह २ लाखांचा दंड

By admin | Updated: January 20, 2017 04:10 IST

अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २ लाख २० हजारांचा दंड सुनावला आहे.

ठाणे : ग्राहकाकडून सदनिकेकरिता स्वीकारलेली रक्कम २ वर्षांनंतर कोणत्याही सूचनेशिवाय परत करून आणि करार रद्द करून सदोष सेवा देणाऱ्या वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे भागीदार अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २ लाख २० हजारांचा दंड सुनावला आहे.के. महाबला आलवा यांनी मेसर्स वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कर्जत येथील प्रकल्पात सदनिका घेण्यासाठी मे २०११ रोजी डेव्हलपर्सच्या ठाणे येथील कार्यालयात १० हजार जमा केले. जुलै २०११ मध्ये त्यांना अलॉटमेंट लेटर दिले. त्यानंतर, त्यांनी १८१८७५ रुपये चेकद्वारे दिले. तर, उर्वरित १०२०६२५ रुपयांची जमवाजमव केली. मात्र, जून २०१३ रोजी वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेडने सदनिका खरेदीचा करार रद्द करून १,९१,८७५ रुपये चेकद्वारे आलवा यांना परत दिले. दोन वर्षांनंतर पैसे परत दिल्याने नवीन सदनिका घेताना अधिक किंमत द्यावी लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, असे सांगून आलवा यांनी वावेस होम्स आणि भागीदारांविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता आलवा यांच्याकडे सर्व कागदपत्रे चोख असल्याचे मंचाने सांगितले.>दोन वर्षे आलवा यांचे पैसे वापरून डेव्हलपर्सने कोणतीही सूचना न देता करार रद्द करून सदोष सेवा दिली आहे. तसेच सदनिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले का? प्रोजेक्ट पूर्ण का होत नाही? पूर्वसूचना न देता करार रद्द का केला? याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे आलवा यांचे नुकसान झाल्याचे मंचाने स्पष्ट केले. परिणामी, वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेडसह त्यांचे भागीदार अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांनी आलवा यांना नुकसानभरपाई म्हणून २ लाख व तक्रार खर्च म्हणून २० हजार द्यावे, असे आदेश मंचाने दिले आहे.