शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना

By admin | Updated: July 4, 2016 03:13 IST

‘गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना’ असा हायटेक फंडा यावेळी पनवेलमधील प्रभाग रचनेत राबविण्यात येणार आहे.

वैभव गायकर,

पनवेल- वॉर्डरचनेत सुसूत्रता यावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना’ असा हायटेक फंडा यावेळी पनवेलमधील प्रभाग रचनेत राबविण्यात येणार आहे. पनवेल नगरपरिषदेच्या प्रभागरचनेत या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वॉर्डरचना करण्यात येणार आहे. आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेसाठी असलेले नकाशे हे ढोबळमानाने केलेले होते. लवकरच या पद्धतीला व नकाशांना छेद देऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये गुगल मॅपिंगची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतदार यादीनुसार नकाशांचा अभ्यास सुरू असून मतदार यादीला योग्य तो नकाशा देण्याचे काम गुगल मॅपिंग प्रक्रि येद्वारे होणार आहे. पनवेलमध्ये लवकरच गुगल मॅपिंगचे ट्रेनिंग सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गुगल मॅपिंग अमलात आणण्याचे प्रयत्न होणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघ, तहसीलदार कार्यालयांतर्गत पनवेल नगरपालिका हद्द, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, उर्वरित ग्रामीण भागांचा समावेश आहे. शिवाय उरण तालुक्यातील ११० केंद्रे पनवेल तालुक्यात समाविष्ट आहेत.एकंदरीत पाहता ५४७ केंद्रे ही पनवेल तालुक्यात येत असल्यामुळे गुगल मॅपिंग प्रक्रियेत अधिक वेळ जाण्याची शक्यता आहे. >रायगड जिल्ह्यात गुगल मॅपिंगसंपूर्ण रायगड जिल्ह्यात गुगल मॅपिंग लागू करण्यात येणार आहे. या हायटेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभागरचना करीत असल्याने निवडणूक कार्यालयाचा वेळ वाचणार आहे, तसेच मानवी हस्तक्षेप टळणार आहे. प्रभाग रचना निश्चित करताना वाटेल त्या पद्धतीने नकाशे काढले जात होते. त्यात प्रभागाची हद्द निश्चित करण्यासाठी नदी, नाले, ओढे या नैसर्गिक हद्दीबरोबरच रस्त्याचा विचार केला जात असे, मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप करून हव्या त्या पद्धतीने प्रभाग रचना तयार करण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असे. हा प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने गुगल मॅपच्या आधारे संगणकीकृत पद्धतीने प्रभागरचना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकामधील संभ्रम कमी होणार अनेक वेळा आपला प्रभागाची सीमा किती कोणती आहे, कोणत्या रस्त्यापासून, कोणत्या चौकापर्यंत तिचा विस्तार आहे. असे प्रश्न पडायचे. मात्र या प्रणालीमुळे प्रभागरचनेत पारदर्शकता येऊन नागरिकांचा संभ्रम कमी होईल. याआधी २०११ च्या जनगणना आयोगाच्या नुसार प्रभाग रचना करण्यात आली होती. यावर्षी नकाशा, डाटा गुगल मॅपिंगवर अपलोड केल्यानंतर गुगल इमेज द्वारे प्रभाग रचना कारण्यात आली .>गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेमुळे जास्तीत जास्त पारदर्शकता येईल. नुकतीच पनवेल नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत ही प्रणाली वापरण्यात आली. ७५०० लोकसंख्या असलेला असा स्वतंत्र प्रभाग तयार करण्यात आला. याकरिता त्या प्रभागांमधील माहितीची केएमएल फाईल तयार करून ती गुगल मॅपवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात आली. - मंगेश चितळे , मुख्याधिकारी, पनवेल नगरपरिषद