शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उद्यानांमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: January 7, 2017 02:46 IST

नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे. शहरातील उद्यानांमध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये महापालिकेने २००९मध्ये शांताबाई सुतार उद्यान उभारले आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे; पण त्याची देखभाल करण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. उद्यानामधील वृक्ष व हिरवळ जगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. ठेकेदार पाइप लावून उद्यानामध्ये सोडून देत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी उतारावरून खाली ओढ्यात जात आहे. सारसोळे सेक्टर ६मधील उद्यानामध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, येथेही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरामध्ये दुभाजक वगळून इतर बहुतांश उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. पालिकाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील नागरिकांना प्रतिव्यक्ती १३० लिटर पाणी याप्रमाणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे; पण उद्यानांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने स्वयंशिस्तीचे पालन करावे. जे ठेकेदार पाण्याची उधळपट्टी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्यानामध्ये वृक्ष व हिरवळीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पाइपचा वापर केल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असून, प्रशासन स्वत: मात्र ठेकेदारांच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे. - महेश कोठीवाले, शाखाप्रमुख, शिवसेना