शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: June 29, 2016 02:27 IST

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले

आविष्कार देसाई,

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले आहे. पेण तालुक्यात सहा ठिकाणी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तोही लवकरच बंद करण्यात येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च करण्यात येत आहे.गेल्या वर्षी अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे मध्यम, तसेच लघु धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळा कडक असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे संकट जिल्ह्यातील काही भागांमध्ये ओढवले होते. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागायची. लहान मुले, महिलांसह वयोवृध्दही पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्यामध्ये २९२ गावे आणि एक हजार ९२६ वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्या होत्या. त्या माध्यमातून टंचाईच्या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकर, बैलगाडीने पोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते.उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याच्या टंचाईने चांगलेच डोके वर काढले होते. जून महिना संपत आला, तरी काही पेण, महाड आणि रोहे तालुक्यांमध्ये अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने समाधानकारक बरसण्यास सुरुवात केल्याने अलिबाग, मुरुड आणि सुधागड-पाली तालुक्यातील प्रत्येकी एक टँकर बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील आठ, कर्जत ५, पोलादपूरमध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पेण तालुक्यामध्ये एकूण १२ टँकर सुरु होते. पैकी सहा टँकर बंद केले आहेत. उरण, पनवेल, खालापूर, तळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातीलही प्रत्येकी दोन असे एकूण ४३ टँकर बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यावर सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाची मेहरबानी आणखी झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून आसपासच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.>पावसामुळे नदी, नाले भरलेरायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार बरसणे सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ६२.०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी १२. ४० मि.मी. पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पाणी भरले जात आहे. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.बहुतांश टँकरने पाणीपुरवठा बंद झाला आहे. फक्त पेण तालुक्यात सहा टँकर सुरु आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च झाला आहे. टंचाई आराखड्यात याच दोन महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येतो.- अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता