शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 28, 2016 03:29 IST

पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो.

पेण : पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो. तीन महिने विकत पाणी नेऊन अत्यंत हालअपेष्टात दिवस काढावे लागतात. मात्र तरीही प्रशासनाकडून तोकडी उपाययोजना के ली जाते. आजघडीला तीव्र पाणीटंचाई भासत असतानाही पेणची ८४ गावे तहानलेली असताना मात्र केवळ पाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पाणी टंचाईची ही समस्या गेली दहा - बारा वर्षांपासूनची. मात्र पाणी टंचाई सुरु झाली की दरवर्षी जिल्हा प्रशासनाची लगबग वाढते. टंचाई निवारणाचे आराखडे तयार होतात. तातडीच्या निधीची मागणी केली जाते, उपाययोजनांचे कागद आढावा बैठकीतून फिरु लागतात. आढावा घेणारी यंत्रणाही सक्रिय होते. जनतेला पाणी देण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतो. उन्हाळा संपला की पाऊस आल्यावर फायली कपाट बंद होतात, प्रत्यक्षात या निवारणातून जनतेपर्यंत पाणी किती पोहचते हे मात्र समजणे कठीण आहे. पेणची ८४ गावे तहानलेली टँकर मात्र पाच कशी तहान भागणार. पाणीटंचाईची दाहकता वाढली असताना त्यावरील उपाययोजना तोकड्या ठरत आहेत.पेणचा खारेपाट पाण्यावाचून शापित जीवन जगतोय. अनेकांनी पीकअप टेम्पो चालकांशी भाडेकरार करुन १ पीम्प प्लास्टीकचा ७० रुपये प्रमाणे पेण नगर परिषदेच्या इमारती जवळील टँकर भरण्याच्या जागेवरुन टेम्पो चालक गावकऱ्यांना पाणी नेत आहेत. पेण पंचायत समिती प्रशासनाने १० टँकरची मागणी केली असताना शासकीय ३ हजार लिटर क्षमतेचे २ टँकर, १० हजार लिटर क्षमतेचे २ टँकर आणि १२ हजार लिटर क्षमतेचा एक असे एकूण खाजगी ३ टँकर जमेस धरुन याच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे. एक टँकर चालक दिवसात दोन याप्रमाणे १० फेऱ्या होतात. शासकीय टँकरच्या ३ फेऱ्या अशा प्रकार १२ फेऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था सुरु आहे. मात्र टँकर पाणी साठवण टाकीची क्षमता कमी असल्याने गावाला पाणी पुरु शकत नाही.गेल्या दशभराच्या अनुभवातून प्रशासकीय यंत्रणेला शहानपण सूचत नाही. टंचाई निवारण आराखड्यातील गावे दरवर्षी तीच असतात. अनेकदा त्यांची संख्या वाढते मात्र कमी होत नाही. सरकारने या प्रश्नी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)