शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

By admin | Updated: July 5, 2016 04:29 IST

पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या

मुंबई/ठाणे : पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालावत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडेच राहत होते़ मात्र वीकेण्डच्या पावसाने चित्र पालटले. पाऊस सुरू झाल्यापासून तलाव क्षेत्रातील जलसाठा रोज २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढला होता़ गेल्या तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचा पाणीसाठा तयार झाला. वर्षभर आवश्यक पाण्याच्या तो १५ टक्केच असून, पाणीकपात कायम राहील.ठाणे-पालघरलाही दिलासाठाणे, पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात तिपटीने वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७३७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सूर्या धरणात, तर सर्वांत कमी पाऊस उल्हास नदीच्या खोऱ्यातील आंध्रा धरणात झाला आहे. बारवी धरणातील साठाही वाढला आहे. (प्रतिनिधी)- मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़. - गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत पाणीकपात सुरू झाल्याने रोज ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी धरणांमध्ये १ आॅक्टोबरअखेर १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़असा वाढला जलसाठा १ जुलै १ लाख १० हजार २ जुलै १ लाख १९ हजार३ जुलै १ लाख ५७ हजार४ जुलै २ लाख २७ हजार(दशलक्ष लीटरमध्ये)