शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई

By admin | Updated: March 3, 2017 02:43 IST

खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे त्रस्त रहिवाशांनी खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हटवार यांनी आठ दिवसांत पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगितले. खारघर शहरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. मात्र, यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सिडकोच्या नियोजनाअभावी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोने वेळीच उपाययोजना न केल्यास नागरिकांना आगामी काळात आणखी त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोकडून पाणीकपात करण्यात येत असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे सेक्टर १२ अ आणि ब परिसरातील नागरिकांनी भाजपाच्या लीना गरड यांना नेतृत्वाखाली सिडकोकडे धाव घेत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावर अधिकारी हटवार यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. तात्पुरता पाण्याचा वापर कमी करून सहकार्य करा, असे आवाहनही केले. >कामोठे सेक्टर ९ येथील काही सोसायट्यांमध्ये दिवसभरात केवळ एकच तास पाणी येते. सध्या ही स्थिती आहे, तर भर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, या चिंतेत नागरिक आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. >कामोठे, पनवेलमधील काही इमारतींमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्यालगत असलेल्या कैलास पार्क या सोसायटीत जवळपास ७० ते ८० कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी सकाळी एकदाच तासभरासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने रहिवासी हैराण आहेत.