शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटावर पाणीटंचाई

By admin | Updated: May 19, 2016 02:57 IST

सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली

उरण : सध्या महाराष्ट्रभर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याणे ठिकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ती त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी घारापुरीचे ग्रामपंचायत सदस्य बळीराम पद्माकर ठाकूर यांनी उरणचे नवनियुक्त नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. घारापुरी बेट हे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. घारापुरी बेटावर प्रामुख्याने राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी तीन गावे असून, २००९-१० मध्ये तीनही गावांत शासनाच्या एका योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, पाणी वितरण व धरण दुरुस्ती या कामी अंदाजे चार ते साडेचार करोड रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र आजतागायत जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आलेले नाही. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. नळाची अनेक कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. मात्र आता धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने घारापुरी ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कुठून आणावे, हा प्रश्न पडला आहे. पाणीटंचाई त्वरित दूर व्हावी व जनतेला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांना एक निवेदन दिले. (वार्ताहर)घारापुरी येथील प्रसिद्ध गुहेतील हौदाने केव्हाच तळ गाठला आहे. तसेच राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर विहिरींची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्यास दुर्गंधी येत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यास घातक असल्याने नागरिकांना वापरता येत नाही. असे असताना ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रार करूनही शासनानेही या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी सांगितले.