शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

पेण खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: March 2, 2017 03:10 IST

१४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे.

पेण : पेणच्या वाशी खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे. या समस्यापूर्ततेसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींवर पाणीप्रश्नामुळे तब्बल २५०० ग्रामस्थांनी बहिष्कार टाकू न आपला निषेध नोंदविला. ज्या शेकापला अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय चाल खेळली होती. तीच खेळी विरोधकांवर बुमरँग होऊन विरोधकांनाच पाणी पाजण्यात शेकाप उमेदवार यशस्वी ठरले. ‘जो जिता वोही सिकंदर’ या नात्याने पेण खारेपाटाला टँकरमुक्त करणे हे शिवधनुष्य शेकापला पेलावे लागणार आहे. पेणमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालात पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर सगळीकडे शेकापचे उमेदवार निवडून आले. पंचायत समितीच्या सभापती म्हणून स्मिता पेणकर या अनुसूचित जमाती आरक्षणच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यात. त्यामुळे पंचायत समितीवर ७ सदस्यांसह एकहाती वर्चस्व शेकापने राखले. पंचायत समितीच्या मार्फत खारेपाटाला दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. दरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो. मात्र, खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.३० कोटींची हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या १५ कोटींच्या वर रकमेची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली आहे. या १५ कोटींतून हेटवण्याचे पाणी शहापाडा धरणात पडणार. मात्र, त्यानंतरच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण प्रणालीवर शेकाप नेत्यांनी विशेष लक्षपूर्वक असे नियोजक केले. त्या निधीची पूर्णता व प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांची प्रभावी अंमलबजावणी तातडीने व्हावी. तसे झाले नाही तर मात्र टँकरमुक्त खारेपाट हा तसाच राहील. शेवटी पेणमधील सर्वसत्ताधीश म्हणून शेकापच बाजीगर ठरलाय. (वार्ताहर)दरवर्षी ५0 ते ५५ लाखांची तरतूददरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो.खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.या त्रासातून सुटका करावी अशी नागरिकांची सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा आहे.