शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी खोऱ्याचा सप्टेंबरअखेर जल आराखडा

By admin | Updated: July 14, 2015 00:44 IST

गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्याचा मसुदा ३० सप्टेंबरला तयार होईल. उर्वरित तापी व कृष्णा खोऱ्याचा मसुदा २०१६ पर्यंत तयार करू, असे शपथपत्र राज्य

औरंगाबाद : गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्याचा मसुदा ३० सप्टेंबरला तयार होईल. उर्वरित तापी व कृष्णा खोऱ्याचा मसुदा २०१६ पर्यंत तयार करू, असे शपथपत्र राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आले. २००७ ते १३ मध्ये सरकारने १८९ प्रकल्पांना मंजुरी दिल्याचे शपथपत्रातून समोर आले. हे प्रकल्प उभारणीचा सरकार पुनर्विचार करणार काय, अशी विचारणाही खंडपीठाने केली.जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे व विकास लोळगे, बन्सीलाल कुमावत यांनी स्वतंत्ररीत्या दाखल केलेल्या जनहित याचिकांवर न्यायमूर्ती आर. एन. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सोमवारी संयुक्त सुनावणी झाली. प्रा. पुरंदरे यांच्या जनहित याचिकेत ‘राज्य जल आराखडा’ तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर लोळगे व कुमावत यांच्या जनहित याचिकेत ‘राज्य जल आराखडा तयार नसताना नाशिक जिल्ह्यात किकवी येथे नवीनधरण बांधण्यास राज्य सरकारने दिलेली मंजुरी बेकायदा असून,तो प्रकल्प रद्द करण्याची विनंतीकेली आहे. राज्याचे प्रभारी महाधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) अनिलसिंह यांनी सोमवारी शपथपत्र दाखल केले.राज्य जल आराखडा तयार नसताना प्रकल्प कसे मंजूर झाले. प्रकल्पांची सद्य:स्थिती काय, हे प्रकल्प पुढे चालू ठेवणार काय, यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)