शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बाराबंगला वसाहतीत पाण्याची बोंब

By admin | Updated: July 13, 2017 04:24 IST

शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासारख्या बड्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या बाराबंगला परिसरातील शासकीय वसाहतींच्या आवारात राहणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाण्याची नवी जोडणी हवी असेल, तर या गोरगरिबांकडे बांधकाम विभागाचे कर्मचारी आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत. ठाणे पूर्व येथील बाराबंगल्यातील शासकीय वसाहतीमधील ‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात असलेल्या शासकीय वसाहतीत राहणारा नोकरवर्ग गेला एक महिना पाण्यासाठी वणवण फिरत आहे. तातडीने पाणी हवे असल्यास पाइपलाइनसाठी आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याने येथील रहिवाशांना सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारा बंगला या शासकीय वसाहतीच्या आऊट हाऊसमध्ये २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार केल्यास नोकरीवर गंडांतर येण्याच्या भीतीने काही गप्प बसतात.‘इंद्रायणी’ बंगल्याच्या आवारात २५ वर्षांहून अधिक काळ चार कुटुंबे राहतात. एक महिन्यापासून त्यांच्या घरात पाणी नाही. इथूनतिथून जाऊन पाणी आणावे लागते. पाणी भरूनभरून हाडे दुखायला लागली आहेत, असे या महिलांनी सांगितले. पाणी भरताभरता तर एका रहिवाशाला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही बंगल्यांतील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी दाबाने तेही केवळ अर्धा तासच पाणी येत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. गांगुर्डे यांनी सांगितले की, मी स्वत: बाराबंगल्यात राहतो. पाण्याची कोणतीही समस्या तेथे नाही. पाण्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी माझ्याकडे तरी आलेल्या नाहीत. संबंधित कर्मचाऱ्याने पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘इंद्रायणी’ बंगल्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून पैसे मागितले असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता मी याविषयी माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले. >शासकीय बंगल्यांच्या आवारातच अव्यवस्थाशासकीय निवासस्थान म्हणून बाराबंगला परिसर ओळखला जातो. येथे अनेक शासकीय अधिकारी राहतात. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था बंगल्याच्या आवारातच करण्यात आलेली आहे. येथील बंगल्यात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतींमध्ये पाण्याची बोंब आहे. याचबरोबर २५ ते ३० वर्षांपासून हे रहिवासी या वसाहतीत वास्तव्य करीत आहे. कधी पाण्याच्या, कधी झाड कोसळण्याच्या, तर कधी छप्पर गळण्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.