शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

डोंगस्तेचे पाणी वापरणार

By admin | Updated: July 4, 2016 03:56 IST

कुडूसजवळ डोंगस्ते बंधारा आहे. त्यातील पाणी पडून आहे.

कुडूस : कुडूसजवळ डोंगस्ते बंधारा आहे. त्यातील पाणी पडून आहे. म्हणजे एकीकडे आसपासची गावे पाण्यासाठी तरसत असताना हा पाणीसाठा पडून आहे त्याचे नियोजन व्हावे ते वापरले तर मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली येऊन उरलेले पाणी आसपासच्या अनेक गावपाड्यांना पिण्यासाठी देता येईल. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनाही राबविता येईल.हे कधी होणार असा प्रश्न येथे आयोजिलेल्या लोकमत आपल्यादारी मध्ये करण्यात आला. त्यावर आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत आपण ग्रामसभेत तसा प्रस्ताव मंजूर करून माझ्याकडे द्या मी तो मार्गी लावतो, असे आमदारांनी सांगितले.वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले असूनही महावितरणचे खांब, वीजवाहक तारा तसेच रोहीत्र यांची अवस्था अत्यंत दारूण आहे. तिची दुरूस्ती करणे गरजेचे आहे हे कधी होणार? असा प्रश्न केला असता महावितरणचे अभियंता वैभव दामले यांनी याबाबतचे टेंडर मंजूर झाले असून लवकरच त्याचे काम सुरू होईल अशी माहिती दिली.या तालुक्यात उत्तम क्रीडापटू आहेत परंतु, त्यांच्यासाठी क्रीडासंकुल नाही त्याकरीता जागादेखील आहे ते कधी होणार? असा प्रश्न विचारला गेला असता या जागेचा सातबारा आहे काय? असा प्रश्न आमदारांनी केला त्यावर होकारार्थी उत्तर आल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मी तयार करून पाठवतो असे स्पष्ट केले.विंचू आणि सर्पदंशाचे रुग्ण ग्रामीण भगात खूप आहेत. मग त्या परिसरातील आरोग्य उपकेंद्रात त्याच्या लसी का नसतात? प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स का नसतात. एक तर रस्ते धड नाही, अ‍ॅम्ब्युलन्स धड नाही, असली तर उपलब्ध होत नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पळापळीत रुग्णाचा जीव जातो त्यामुळे ही औषधे प्रत्येक आरोग्य केंद्रात ठेवा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. तर आयोजन लोकमतचे वार्ताहर वसंत भोईर यांनी केले होते. हा कार्यक्रम चिंचघर रोडवरील ह.वि. पाटील विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. (वार्ताहर)