शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेचे पाणी रेल्वेने लातूरला

By admin | Updated: April 6, 2016 04:59 IST

लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लातूर/मिरज/पुणे : लातूर शहरासाठी येत्या १५ दिवसांत मिरजेहून रेल्वेने पाणी आणले जाणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिरज रेल्वे स्थानकालाही भेट देऊन खडसे यांनी तयारीची माहिती घेतली. लातूरकरांची तहान भागवण्यासाठी मध्य रेल्वे, तसेच राज्य प्रशासनानेही जय्यत तयारी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.लातूरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आम्हाला पंढरपूरहून रेल्वेने पाणी देण्यास तीन आठवड्यांपूर्वीच मंजुरी दिली आहे, परंतु तिथून पाण्याचा होणारा अपव्यय परवडणारा नसल्याने मिरजेची निवड करण्यात आली आहे. मिरज - लातूर रेल्वेट्रॅक आहे. महसूल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हीच बाब सोयीची असल्याचे लक्षात आले आहे. लातूर रेल्वे स्थानकात पाणी आल्यानंतर ते विहिरीत सोडणे आणि तिथून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेणे, अथवा त्याचे वाटप करण्यासंबंधीच्या योजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने, लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. रेल्वेची तयारी पूर्णपाणी वाहतूक करण्यासाठी इंधन टँकरचाच वापर करण्यात येणार असून, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून त्यासंबंधी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हे पाणी घेण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून ५० टँकर असलेला रेक (पाण्याचे टँकर असलेली रेल्वेगाडी) तयार करण्यात येत असून, त्यातील २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे, तर आणखी २५ टँकरच्या स्वच्छतेचे काम ९ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)