पुसेगाव : ‘निढळला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ तसेच येथील पंचतारांकित एमआयडीसीसाठी कण्हेर धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कल्पकता व दूरदृष्टीच्या जोरावर गाव केंद्रबिंदू मानून अनेक लोकहिताच्या योजना तयार केल्या आणि शासनाने त्या यशस्वीपणे राबविल्या म्हणूनच निढळ हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. निढळने तर राज्याला जलसंधारणाचा संदेश दिला आहे,’ असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले. निढळ, ता. खटाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक गजानन खुस्पे, सतीश फडतरे, अर्जुन वलेकर, मारुती ठोंबरे, पै. सागर साळुंखे, सरपंच संगीता इंजे, उपसरपंच श्रीमंत निर्मळ, सोसायटीचे अध्यक्ष किसन पाटील, उपाध्यक्ष शैलेश मोहिते, जोतिराम घाडगे, अभिषेक दळवी, संदीप सत्रे, दत्तात्रय खुस्पे, उबंरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, अशोक खुस्पे, अशोक यादव, विलास पाटोळे, विजय शिंदे, संतोष खुस्पे, दिनकर खुस्पे, जगन्नाथ दळवी, तुकाराम यादव, बळीराम ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, संतोष ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, दिलीप ठोंबरे, सुधीर ठोंबरे, कातळगेवाडीचे उपसरपंच भरत मोरे, संदीप जाधव, भगवान जाधव उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाझर तलावांची कामे झाली आहेत. परंतु त्या कामांकडे वेळीच लक्ष न दिल्याने पाझर तलावाची गळती, गाळ साठणे अशा या परिस्थितीमुळे पाणीसाठा अद्यापही होत नव्हता. अनेक साईट्स उपलब्ध असतानाही बंधाऱ्यांची कामे न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. पाण्याचे गांभीर्य ओळखून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाझर तलाव दुरुस्ती, खोलीकरण, रुंदीकरण, नवीन सिमेंट बंधारे कामांसाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली. पाणी साठवण क्षमतेत चांगलीच वाढ झाल्यामुळे शेतजमिनीला फायदा होऊ लागला आहे.’पाच वर्षांत मतदारसंघात ९५० कोटींची विकासकामे मार्गी लावली. निढळ ग्रामस्थ आणि त्यांचे मार्गदर्शक चंद्रकांत दळवी यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निढळला भेट देऊन कौतुकाची थाप टाकावी. यासाठी त्यांना निढळला आणण्यासाठी आग्रह धरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय गुरव यांनी प्रास्ताविक केले. संतोष खुस्पे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सर्वांसमोर इतिहास उभा...४पावसाच्या पाण्याचा थेंबन्थेंब जमिनीत मुरला पाहिजे. पावसाचे पाणी अडविले जावे, ओढ्यांना स्वच्छ पाण्याचा पूर यावा, यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी व ग्रामस्थांनी एकसंधतेने पुढाकार घेऊन दहा वर्षांपूर्वी साखळी सिमेंट बंधारे, माती नालाबांधसह जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करून जलक्रांती करण्याचा इतिहास केला आहे. हा इतिहास संपूर्ण राज्यापुढे निढळकरांनी उभा केला आहे
निढळने राज्याला दिला जलसंधारणाचा संदेश
By admin | Updated: June 8, 2015 00:47 IST